वाचक शेफ
प्रिया निकुम- response.lokprabha@expressindia.com

साहित्य : पारले जी बिस्किटे २० नग, हाईड अ‍ॅन्ड सिक बिस्किटे १० नग, पिठीसाखर २ टेस्पून, दूध आवश्यकतेनुसार, तूप ग्रीसिंगसाठी.

कृती : प्रथम दोन्ही प्रकारच्या बिस्किटांची मिक्सरवर पूड करून घ्या. ती एका बाऊलमध्ये काढून घेऊन त्यामधे साखर मिसळा. नंतर त्यामधे कोमट दूध घालून ढवळा. गुठळ्या राहू देऊ नका. मिश्रण थोडे घट्टसरच ठेवा. नाहीतर केक बसका होतो. आता तयार मिश्रण ग्रीस केलेल्या केकच्या भांडय़ात ओता. प्रीहीट ओवनमध्ये १८० सेल्सियसला २० मिनिटे ठेवा. टूथपिक टोचून पाहा. ती केकचे पीठ न चिकटता बाहेर आली की केक झाला.
सौजन्य – लोकप्रभा