अंडी ही शाकाहारी असतात की मांसाहारी हा वाद कायमच रंगत असतो. अनेकांच्या मते अंडी हे मांसाहारी असता, तर काहींच्या मते, ती शाकाहारी असतात. परंतु, हा वाद जरी कायम असला तरीदेखील अंडी खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे लहान मुलांना आवर्जुन अंडी खाण्यास देतात. मात्र,बाजारातून आणलेली अंडी चांगली आहेत की नाही हे ओळखणं कठीण असतं. त्यामुळे @MyGovIndia या  अधिकृत ट्विटर हॅन्डलवर अंडी चांगली आहेत की नाही हे ओळखण्याच्या काही सोप्या पद्धती सांगितल्या आहेत.

पाण्याने भरलेल्या एका ग्लासात एक अंड टाका. पाण्याने भरलेल्या एका ग्लासामध्ये एक अंड अलगद सोडा. जर अंड ताजं असेल तर ते ग्लासाच्या तळाशी जाऊन बसेल. तसंच ते अडवं होईल. मात्र, जर अंड जुने किंवा खराब झालं असेल तर ते ग्लासाच्या तळाशी न जाता. पाण्यावर तरंगू लागेल.

Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
World Art Day Art and Income Source in Marathi
पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल; पण कलेशी केलेली मैत्री…आयुष्य समृद्ध करणाऱ्या कलेमुळे तुमच्या करिअरला मिळू शकते नवी दिशा
alu in garden
निसर्गलिपी : येता बागेला बहर…
save hasdeo forest
हसदेव धुमसतंय, सरकार लक्ष देणार का?

दरम्यान, खराब अंडी खाल्ल्यामुळे साल्मोनेला संसर्ग होण्याची शक्यता असते. साल्मोनेला हा एक प्रकारचा विषाणून आहे. ज्यामुळे विषबाधा होऊन अतिसार, उलट्या आणि पोटात चमक भरणे या तक्रारी उद्धभू शकतात.