News Flash

पावसाळ्यातील संसर्गजन्य आजार ठेवा दूर; अशी घ्या काळजी

पावसाळ्यात घ्या आरोग्याची काळजी

डॉ. गौरव पाटील

पावसाळा हा ऋतू किती आनंद देणारा असला तरी या काळात अनेक रोगराई आणि संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव होताना दिसतो. पावसाळ्यात अनेक वेळा दुषित पाणीपुरवठा होतो. असं दुषित पाणी प्यायल्यामुळे कॉलरा, जुलाब, कावीळ असे आजार वाढतात. याशिवाय डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो आणि लेप्टो यांसारख्या आजारांच्या रूग्णसंख्येही वाढ झालेली पाहायला मिळते.परंतु, हे आजार केवळ दुषित पाण्यामुळेच वाढत नसून त्यामागे अन्यही काही कारणं आहेत. त्यामुळे चला तर पाहुयात संसर्गजन्य आजारांपासून दूर राहण्याचे काही उपाय.

संसर्गजन्य आजारापासून स्वतः बचाव कसा कराल?

१. दररोज उकललेले पाणी प्या

२. कच्च्या भाज्या न खाता चांगल्या शिजवून घ्या

३. शिळे अन्नपदार्थ खाणे शक्यतो टाळावेत.

४. वैयक्तिक स्वच्छतेसह अन्नपदार्थ व घरातील भांडीही स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. जेणेकरून संक्रमणाचा धोका टाळता येऊ शकतो.

५. तेलकट, तिखट आणि प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थ खाऊ नयेत, ज्यामुळे आतड्यांना इजा होईल.

६. आहारात दह्याचा वापर आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे

७. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःच औषधोपचार घेणं शक्यतो टाळा.

८. ताप, उलट्या किंवा शौचातून रक्त जाणे हा त्रास अधिक दिवस राहिल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.

पावसाळ्यात या संसर्गजन्य आजारांचा सर्वांधिक धोका लहान मुलं आणि वयोवृद्धांना असतो. या काळावधीत त्यांच्या आरोग्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं असते. ते पौष्टिक आहाराचे सेवन करतात का आणि तासभराने पाणी पितात का हे पाहणं आवश्यक आहे. बऱ्याच प्रकरणात अशा रूग्णांमध्ये आतड्यांसंबंधी विकार उद्भवतात. अशावेळी वेळीच लक्षणं ओळखून डॉक्टरांशी याबाबत चर्चा करणे गरजेचं आहे.

( लेखक डॉ. गौरव पाटील हे मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात गॅस्ट्रोन्टेरोलॉजिस्ट आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 5:14 pm

Web Title: rainy season diseases follow guidelines and remedies ssj 93
Next Stories
1 शरीरावर खाज सुटल्यामुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ उपाय नक्की करा
2 Google चा ‘स्वस्त’ Pixel 4a झाला लाँच, जाणून घ्या किंमत आणि डिटेल्स
3 पोटदुखीपासून ते अन्नपचन होईपर्यंत ओवा खाण्याचे ७ फायदे
Just Now!
X