ढगाळ वातावरण किंवा मुसळधार कोसळणारा पाऊस पाहून आपल्याला अंथरूणात मस्त पांघरुण घेऊन झोपावसं वाटतं ना. किती प्रयत्न केला तरी डोळ्यांवरची झोप काही जात नाही. या काळात सुस्तच नाही तर थकल्यासारखं वाटत राहातं. काय आहे असं पावसात, ज्यामुळे आपल्याला झोपावं असं वाटत राहातं?

याविषयी स्लीप थेरपिस्ट डॉ. प्रीती देवनानी म्हणाल्या, अशाप्रकारे पावसामुळे आळस येण्याचं एक कारण म्हणजे हवामान आणि दुसरं म्हणजे त्याच्याशी जोडलेले आवाज. सूर्य हा आपल्या शरीराचा योजक असतो. आपल्या शरीराचा ताल आणि घड्याळ याच्या हातात असतं, पर्यावरणाशी जुळवून ठेवण्याचं काम तो करतो. मेलाटोनिन हे झोपचे संप्रेरक नियंत्रित करण्याचे काम सूर्य करतो. सूर्य आकाशात तळपत असतो तेव्हा आपल्या शरीरात मेलाटोनिन संप्रेरक कमी प्रमाणात स्रवते, आणि आपण जागे असतो. पावसाळी वातावरणात सूर्य कमी प्रमाणात दिसतो, ढग सूर्याला बहुतांश दिवस झाकून टाकतात. यामुळे मेलाटोनिनचे आपल्या शरीरातील प्रमाण वाढते आणि आपल्याला झोप आल्यासारखे वाटत राहते.

Breakfast Recipe
Breakfast Recipe : उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी बनवा मुगडाळीचा पौष्टिक नाश्ता, जाणून घ्या ही हटके रेसिपी
How to Identify Chemically Injected Watermelon FSSAI Suggestion
कलिंगड सुया टोचून, पावडर घालून पिकवलाय का हे एका झटक्यात ओळखा; ‘या’ खुणा पाहूनच करा खरेदी
How to soften your face with Malai Dry Skin Care
Skin Care: दुधाची २ चमचे साय घ्या आणि उन्हाने काळवंडलेल्या-निस्तेज चेहऱ्यावर करा जादू
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन

याशिवाय, दुसरे कारण म्हणजे आर्द्रता. पावसाळ्यात हवेत मोठ्या प्रमाणावर बाष्प असते. जास्त आर्द्रतेमुळे आपल्याला घाम येतो, यामुळे आपली झोप चाळवते. हवेतील ओलाव्यामुळे दमटपणा आणि बुरशीचे प्रमाण वाढीस लागते, खास करून घरात. जर तुम्हाला याचा संसर्ग होत असेल तर त्याचाही परिणाम तुमच्या शरीरावर होत असतो. आणि रात्रीच्या अपुऱ्या झोपेचा परिणामही तुम्हाला दिवसभर सुस्ती येण्यात होतो. दुसरं म्हणजे माणसालाही इतर सस्तन प्राण्यांप्रमाणे शांत वातावरणात झोपायला आवडते. पावसाळ्यात धीम्या, संततधार पावसामुळे असेच वातावरण निर्माण होत असल्याने आपल्याला दिवसाही झोप येते. तर दुसरीकडे, मोठ्या आवाजामुळे आपली झोपमोड होते. विजा कडाडणे, पावसाचा मोठा आवाज सुरू राहिल्यास आपल्या झोपेचे चक्र बिघडते.

पण या काळातही आपले मन आणि शरीर ताजेतवाने रहावे यासाठी काही सोप्या गोष्टी केल्यास त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो.

१. योग्य तो आहार घ्या

मेदयुक्त पदार्थ खाल्ल्याने शरीरातील साखर कमी होते आणि पर्यायाने ऊर्जाही कमी होते. आहारात योग्य प्रमाणात प्रथिनांचा समावेश असू दया, शेंगदाणे आणि काजू खाल्ल्यानेही तुम्हाला सक्रिय राहण्यास मदत होईल.

२. व्यायामाने दिवसाची सुरुवात करा.

व्यायामामुळे शरीरात एंडोरफिन्स स्रवते आणि यामुळे तुम्ही ताजेतवाने होता. उत्तम व्यायामानंतर तुम्हाला तासाभरात प्रसन्न वाटते आणि उरलेल्या वेळेतही तुमचे शरीर एकदम अलर्ट राहाते.

३. थोडा प्रकाश घ्या.

पाऊस जेव्हा कमी होईल, आकाश निरभ्र असेल तेव्हा बाहेर जाऊन जरा प्रकाश अंगावर घ्या. थोडा नैसर्गिक प्रकाश तुम्हाला मिळाला तरी मेलाटोनिन संप्रेरक स्रवू लागते आणि तुमच्या सुस्तीवर त्याचे नियंत्रण राहते.