News Flash

भन्नाट कल्पना.. चक्क उंटाच्या मदतीने सुरु केली फिरती लायब्ररी

जोधपूरमध्ये दुर्गम गावांमधील मुलांकरिता 'रूम टू रीड' मोहिमेअंतर्गत गावात उंटगाडीवरील लायब्ररी सुरू करण्यात आलीय.

भन्नाट कल्पना.. चक्क उंटाच्या मदतीने सुरु केली फिरती लायब्ररी
उंटाच्या मदतीने सुरु केली फिरती लायब्रेरी (Photo: Reuters )

ज्ञान मिळविण्यासाठी वाचनाची गरज असते. ग्रामीण भाग त्यापासून वंचित असल्याने वाचन संस्कृती जोपासणे काळाची गरज आहे. सध्या करोनाच्या या काळात शाळा या अद्याप बंदच आहेत. मात्र आपण आपल्या जवळच्या ग्रंथालयामधून आपल्या मुलांकरिता पुस्तक आणतो. दुसरीकडे पहिलं तर असे काही दुर्गम भाग आहेत जेथे ग्रंथालय उपलब्ध नाही, आणि लहान मुलं ही शिक्षणापासून वंचित आहे, त्यासाठी ‘रूम टू रीड’ या संस्थेने ग्रामीण भागात जाऊन उंटावरील लायब्ररी सुरू केली आहेत.

राजस्थानच्या जोधपूरमध्ये दुर्गम गावांमधील मुलांकरिता ‘रूम टू रीड’ मोहिमेअंतर्गत गावात उंटगाडीवरील पहिली मोबाईल लायब्ररी गावात सुरू करण्यात आली आहे. जोधपुरच्या ३० गावांमध्ये याची सुरुवात करण्यात आली आहे. तसेच उंटाच्या गाडीवर १५०० पुस्तकांनी भरलेली आणि फुलांनी व फुग्यांनी सजवलेली पहिली मोबाईल लायब्ररी गावात आल्यावर मुलांच्या चेहर्‍यावर आनंद पाहायला मिळतो.

उंटावरून लायब्ररीची सुरुवात

ज्या भागात मुलांसाठी लायब्ररी उपलब्ध नाही, अशा भागात त्या ठिकाणी उंटाच्या गाडीवर लहान मुलांपर्यंत ही लायब्ररी पोहचवली जाते. ‘रूम टू रीड’ या मोहिमेअंतर्गत उंटावरील लायब्ररी सुरू करण्यात आली आहे. यामुळे आता मुले त्यांच्या आवडीची पुस्तके सहज वाचू शकतील. जोधपूरच्या 30 गावांमध्ये ही लायब्ररी उंटाच्या गाडीने सुरू करण्यात आली आहे. यावेळी शालेय शिक्षण व सहसंचालक प्रेमचंद साखला यांनी संगितले की ही लायब्ररी आंतरराष्ट्रीय वाचन अभियान 2021 अंतर्गत सुरू करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून रूम टू रिड संस्था आणि जिल्हा प्रशासन मिळून यांनी एकत्रित येऊन उंटाच्या गाडीवर फिरती लायब्ररी सुरू केली आहे. यामध्ये कथा आणि चित्रकलेची पुस्तके अधिक आहेत. लायब्ररीत स्टोरी टेलरही असेल, जो मुलांना गोष्टी सांगेल. मुलांसोबतच पालकांनाही कमीत कमी १५ ते २०  मिनिटे अभ्यासाला बसावे लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 3, 2021 4:02 pm

Web Title: rajasthans unique mobile library and storyteller on camel cart for village kids scsm 98
Next Stories
1 Ganesh Chaturthi 2021: या वर्षी कधी होणार गणपती बाप्पाचे आगमन?; जाणून घ्या तारीख
2 गोल्ड प्लेटेड वडापाव खाणार का? किंमत आहे फक्त…
3 आधार कार्ड अपडेट करण्यासाठी ‘ही’ कागदपत्रे आवश्यक; UIDAI ने केली यादी जाहीर
Just Now!
X