05 December 2020

News Flash

RBI मध्ये दहावी पास असणाऱ्यांसाठी बंपर भरती

सर्वात जास्त जागा मुंबईसाठी आहेत.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (संग्रहित छायाचित्र)

भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) मध्ये २७० पदाच्या भरतीसाठी आवेदन मागविण्यात आले आहेत.आरबीआयमध्ये सुरक्षारक्षक पदांच्या २७० जागाची भरती निघाली आहे. यासाठी शैक्षणिक पात्रताची मर्यादा दहावी पास ठेवण्यात आली आहे. याबाबतची सर्व माहिती आरबीआयच्या वेबसाईटवर (www.rbi.org.in) उपलब्ध आहे. भारतातील एकूण १८ शहरांमध्ये या जागा भरल्या जाणार आहेत. सर्वात जास्त जागा मुंबईमध्ये आहेत. ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत या जागेसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करू शकता.

एकूण जागा : २७० (एससी-३०, एसटी- ३७ आणि ओबीसी ५२ जागा अरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.)

वयाची मर्यादा – कमीत कमी १८ वर्ष असायला हवे आणि २५ वर्षापेक्षा जास्त वय असू नये.

शैक्षणिक पात्रता :- सर्व इच्छूक उमेदवारांना मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठातून दहावी किंवा त्याच्या समतुल्यतेची पात्रता असणे आवश्यक आहे.

पगार: – उमेदवार वेतन घेऊ शकता रु. १०९४०-२३७०० / – प्रत्येक महिन्याला

ग्रेड पे : – नियमानुसार

शहरानुसार अशा आहेत जागा –
पाटना – १३
लखनऊ – ९
कानपूर – १२
जयपूर – १६
नवी दिल्ली – ५
चंदीगड – ७
अहमदाबाद -११
भोपाळ – ७
मुंबई – ८०

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2018 1:41 pm

Web Title: rbi recruitment 2018 apply online 270 security guards posts
Next Stories
1 Jawa च्या 3 शानदार मोटरसायकल भारतात लाँच, जाणून घ्या सर्वकाही
2 11 हजार रुपयांत बुक करा नवी Maruti Ertiga, 21 नोव्हेंबरला होणार लाँच
3 जाणून घ्या लहान मुलांशी पैशाबाबत चर्चा करणं कधी सुरू करावं?
Just Now!
X