Realme 2 Pro India Launch  : रियलमीने आपला नवीन स्मार्टफोन Realme 2 Pro भारतामध्ये लाँच केला आहे. ग्रेटर नोएडा येथील एका आयोजित कार्यक्रमात कंपनीने नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. Realme 2 Pro तीन रंगात उपलब्ध आहे. यामध्ये आइस लेक, ब्लू ओसियन आणि ब्लॅक सी या रंगाचा समावेश आहे.

११ ऑक्टोबर पासून हा फोन बाजारांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. लाँच ऑफरनुसार, जिओ ग्राहकांसाठी १.१ टीबी डेटा आणि ४, ४५० रुपयांपर्यंत ग्राहकांना फायदा होणार आहे. यावर नो कॉस्ट ईएमआय ऑफरही दिली आहे. Realme 2 Pro या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य म्हणजे याला ८ जीबी रॅम देण्यात आली आहे. याचा डिस्प्ले ६. ३ इंच आहे. १२८ जीबी पर्यंत याचे इनबिल्ट स्टोरेज आहे. तसेच या फोनमध्ये ड्युल फ्रंट व रिअर कॅमेराही देण्यात आला आहे. या फोनची किंमत भारतामध्ये १५, ९९० रूपयांपासून सुरू होत आहे.

रियलमीच्या नव्या फोनला २० हजार रूपयांपेक्षा कमी किंमतीच्या प्रकारात लाँच केले आहे. Realme 2 Pro च्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या स्मार्टफोनची किंमत १३, ९९० रूपये आहे. तर ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजवाल्या स्मार्टफोनची किंमत १५, ९९० रुपये आहे. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरज असणाऱ्या Realme 2 Pro स्मार्टफोनची किंमत १७, ९९० रूपये आहे.

Realme 2 Pro चे स्पेसिफिकेशन्स

६.३ एचडी डिस्प्ले (2340×1080 पिक्सल)
स्नॅपड्रॅगन 660 एआयई चिप
४, ६ आणि ८ जीबी रॅममध्ये उपलब्ध
६४ आणि १२८ जीबी पर्यंत स्टोरेज
ड्युअल फ्रंट व ड्युअल रियर कॅमरे
१६ मेगापिक्सल प्रायमरी व २ मेगापिक्सल सेकंडरी सेंसर
सेल्फी आणि व्हीडियोसाठी एआय ब्यूटी 2.0
अनलॉकसाठी फिंगरप्रिंट सेंसर
ड्युअल सिम सपोर्ट
3500mAh बॅटरी
यूएसबी
ओटीजी
ब्लूटूथ
फोर जी वीओएलटीई
डिस्टेंस सेंसर
एक्सीलेरोमीटर सेंसर
जायरोस्कोप सेंसर
जियोमॅग्नेटिक सेंसर