14 October 2019

News Flash

Flash Sale : ‘रिअलमी ३ प्रो’ खरेदी करण्याची आज संधी

या मोबाइलच्या खरेदीवर काही खास ऑफर्सदेखील देण्यात आल्यात

स्मार्टफोन बनवणाऱ्या रिअलमी (Realme) कंपनीच्या Realme 3 pro या नव्या स्मार्टफोनसाठी आज भारतात फ्लॅश सेल आयोजित करण्यात आला आहे. दुपारी 12 वाजेपासून फ्लिपकार्ट आणि रिअलमीच्या अधिकृत संकेतस्थळावर या फोनची विक्री होणार आहे.

काही दिवसांपूर्वीच कंपनीने Realme 3 pro हा स्मार्टफोन दिल्लीमधील एका इव्हेंटमध्ये लाँच केला होता. Realme 3 ची ही पुढील आवृत्ती आहे. लाँच इव्हेंटवेळीच कंपनीने Realme 3 Pro चे दोन व्हेरिअंट्स (4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज) बाजारात आणणार असल्याचं जाहीर केलं होतं. पण पहिल्या सेलआधीच कंपनीने Realme 3 Pro स्मार्टफोनचं अजून एक व्हेरिअंट सादर केलं. 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेलं हे नवं व्हेरिअंट कंपनीने बाजारात आणलं.

या मोबाइलच्या खरेदीवर काही खास ऑफर्सदेखील देण्यात आल्या आहेत. अॅक्सिस बँक बझ क्रेडीट कार्डवरून हा फोन खरेदी केल्यास ५ टक्क्यांची अतिरिक्त सवलत मिळणार. त्याशिवाय फोन नो कॉस्ट इएमआयवरदेखील खरेदी करता येऊ शकतो. मोबाइलवर एक वर्षाची वॉरंटी आणि अॅक्सेसरीजवर ६ महिन्यांची वॉरंटी असणार आहे.

किंमत –
Realme 3 Pro (4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज) – 13,999 रुपये
Realme 3 Pro (6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज) 16,999 रुपये
Realme 3 Pro (6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज) 15,999 रुपये

या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७१० प्रोसेसर असून बॅटरी क्षमता ४०४५ एमएएच आहे. फोन युजर्स तब्बल सात तास पब्जी गेम खेळू शकतात असा दावा कंपनीने केला आहे. त्याशिवाय साडे नऊ तास युट्युब व्हिडिओ पाहू शकतात. त्याशिवाय फोनवर १८.३ तास वेब ब्राउजिंग करू शकतात असाही दावा कंपनीने केला आहे.

फिचर्स –

– कार्बन ग्रे, नाइट्रो ब्लू आणि लाइटनिंग पर्पल रंगामध्ये उपलबद्ध
– ड्युअल-सिम
– 6.3 इंचा स्क्रीन
– कॉर्निंग गोरिल्ला ग्लास
– ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 प्रोसेसर
– डु्युअल रियर कॅमरा
– 16 मेगापिक्सल प्रायमरी कॅमरा
– 25 मेगापिक्सल सेल्फी कॅमरा
– हँडसेट ब्लूटूथ 5.0
– बॅटरी 4,045 एमएएच

First Published on May 13, 2019 12:12 pm

Web Title: realme 3 pro flash sale via flipkart and realme website