स्मार्टफोन बनवणाऱ्या रिअलमी (Realme) कंपनीने भारतात आपला नवा स्मार्टफोन Realme 3 pro लाँच केला आहे. Realme 3 ची ही पुढील आवृत्ती असेल. या फोनची किंमत 13,999 पासून सुरू होते. सोमवारी दिल्लीमध्ये आयोजित इव्हेंटमध्ये फ्लॅगशीप रिअलमी ३ प्रो फोन लाँच करण्यात आला. ४ जीबी रॅमच्या फोनची किंमत १३, ९९९ तर ६ जीबी रॅमची किंमत १६९९९ रूपये असणार आहे.

नुकताच लाँच करण्यात आलेल्या Realme 3 च्या तुलनेत या स्मार्टफोनचा कॅमेरा, प्रोसेसर, रिझॉलव्हेशन आणि स्क्रीन याबाबतीत दर्जेदार आहे. Realme 3 Pro ची स्क्रीन 6.3 इंचाची एचडी स्क्रीन आहे. या फोनचा स्नॅपड्रैगन 710 प्रोसेसर आहे.

रियलमी 3 प्रो ची विक्री २९ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. रिअलमी वेबसाईट आणि फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलबद्ध असणार आहे. २९ तारखेला होणाऱ्या सेलमध्ये रिअलमी ३ प्रो खरेदी करणाऱ्या पहिल्या एक हजार ग्राहकांना Realme Buds मोफत दिले जाणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

एचडीफसी बँकेच्या क्रेडीट, डेबिट आणि ईएमआई खरेदीवर एक हजार रूपयांपर्यंतचा जिस्काउंट मिळणार आहे. शिवाय Reliance Jio मधून खरेदी करणाऱ्या 5,300 रुपयांची कॅशबॅक ऑफर देण्यात आली आहे.

काय आहेत फिचर्स –

४ जीबी रॅम, ६ जीबी रॅममध्ये उपलबद्ध
६४ जीबी, १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज
कार्बन ग्रे, नाइट्रो ब्लू आणि लाइटनिंग पर्पल रंगामध्ये उपलबद्ध
ड्युअल-सिम
– 6.3 इंचा स्क्रीन
– कॉर्निंग गोरिल्ला ग्लास
– ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 प्रोसेसर
– डु्युअल रियर कॅमरा
– 16 मेगापिक्सल प्रायमरी कॅमरा
– 25 मेगापिक्सल सेल्फी कॅमरा
– हँडसेट ब्लूटूथ 5.0
– बॅटरी 4,045 एमएएच