Realme ने या आठवड्याच्या सुरूवातीलाच आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Realme 3 Pro लाँच केला होता आणि तेव्हापासूनच या स्मार्टफोनबाबत बरीच चर्चा आहे.

लाँच इव्हेंटवेळीच कंपनीने Realme 3 Pro चे दोन व्हेरिअंट्स (4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज) बाजारात आणणार असल्याचं जाहीर केलं होतं. या स्मार्टफोनसाठी पहिला सेल 29 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. पण पहिल्या सेलआधीच कंपनीने Realme 3 Pro स्मार्टफोनचं अजून एक व्हेरिअंट सादर केलं आहे.

6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेलं हे नवं व्हेरिअंट कंपनीने बाजारात आणलं आहे. याबाबत कंपनीने ट्विटरद्वारे माहिती दिली आहे. 29 एप्रिल रोजी होणाऱ्या पहिल्या सेलमध्ये रिअलमी 3 प्रो स्मार्टफोनचे तीन व्हेरिअंट्स उपलब्ध केले जातील असं कंपनीने ट्विटरद्वारे जाहीर केलं आहे.

किंमत –
Realme 3 Pro (4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज) – 13,999 रुपये
Realme 3 Pro (6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज) 16,999 रुपये
Realme 3 Pro (6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज) 15,999 रुपये

फिचर्स –

– कार्बन ग्रे, नाइट्रो ब्लू आणि लाइटनिंग पर्पल रंगामध्ये उपलबद्ध
– ड्युअल-सिम
– 6.3 इंचा स्क्रीन
– कॉर्निंग गोरिल्ला ग्लास
– ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710 प्रोसेसर
– डु्युअल रियर कॅमरा
– 16 मेगापिक्सल प्रायमरी कॅमरा
– 25 मेगापिक्सल सेल्फी कॅमरा
– हँडसेट ब्लूटूथ 5.0
– बॅटरी 4,045 एमएएच