News Flash

आता ऑफलाइन खरेदी करा Realme चे 2 शानदार स्मार्टफोन

दमदार ऑफर्सचा ग्राहकांना फायदा व्हावा यासाठी Realme कंपनीने 1 ते 3 ऑगस्टदरम्यान 'Realme freedom sale' आयोजित केलाय

(रियलमी X स्पायडरमॅन व्हर्जन)

चीनच्या Realme कंपनीने आपले Realme X आणि Realme 3 हे दोन स्मार्टफोन आता ऑफलाइन विक्रीसाठीही उपलब्ध असतील अशी घोषणा केली आहे. हे दोन्ही फोन 1 ऑगस्टपासून ऑफलाइन खरेदी करता येणार आहे. ऑफलाइन म्हणजे या फोनच्या खरेदीसाठी आता तुम्हाला सेल केव्हा सुरू होणार याची वाट पहावी लागणार नाही. याशिवाय Realme X स्मार्टफोनचं स्पायडर मॅन व्हर्जन 30 जुलैपासून खरेदी करता येईल असंही कंपनीने जाहीर केलंय. या फोनसोबत ग्राहकांना स्पायडरमॅनशी निगडीत काही भेटवस्तू देखील दिल्या जातील.

Realme कंपनीने 1 ते 3 ऑगस्टदरम्यान ‘Realme freedom sale’ आयोजित करणार असल्याचीही घोषणा केलीये. या सेलमध्ये रियलमी 3 प्रोच्या सर्वच व्हेरिअंट्सवर एक हजार रुपयांची सवलत मिळणार आहे. याशिवाय फ्रिडम सेलमध्ये अन्य अनेक ऑफर्स ग्राहकांसाठी असतील.

Realme X  मध्ये 6.53 इंचाचा FHD+ नॉचलेस सुपर AMOLED डिस्प्ले आहे. यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चं सुरक्षाकवच असून पोलर व्हाइट आणि स्पेस ब्ल्यू अशा दोन रंगांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध असेल. मागील बाजूला ड्युअल कॅमेरा सेटअप असून यातील एक कॅमेरा 48 मेगापिक्सल आणि दुसरा 5 मेगापिक्सलचा आहे. कॅमेऱ्यात Sony IMX586 सेंसरचा वापर करण्यात आलाय. सेल्फीसाठी या फोनमध्ये Sony IMX471 सेंसरसह 16 मेगापिक्सलचा AI पॉप-अप सेल्फी कॅमेरा आहे. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रैगन 710AIE प्रोसेसर आहे. हा फोन पूर्ण चार्ज होण्यासाठी 78 मिनिटांचा वेळ लागतो असा कंपनीचा दावा आहे.

Realme X फीचर्स –

डिस्प्ले : 6.53 इंच
प्रोसेसर : क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710
फ्रंट कॅमेरा : 16-मेगापिक्सल
रियर कॅमेरा : 48-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सल
रॅम : 8 जीबी
स्टोरेज : 128 जीबी
बॅटरी क्षमता : 3765 एमएएच
ओएस : अँड्रॉइड
रिझोल्यूशन :  1080

Realme X किंमत – Realme X – 4GB रॅम+128GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 16 हजार 999 रुपये, तर 8GB रॅम+128GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 19 हजार 999 रुपये आहे.

Realme 3

– 6.2 इंच एवढा HD+ ड्यूड्रॉप डिस्प्ले

– रिझोल्युशन 1520×720 पिक्सल

– 12nm MediaTek Helio P70 प्रोसेसर

– ‘डायनॅमिक डार्क आणि रेडिएंट ब्ल्यु’ रंगात उपलब्ध

– 4,230mAh क्षमतेची बॅटरी

-13 मेगापिक्सलाचा फ्रंट कॅमेरा

-2 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2019 12:09 pm

Web Title: realme 3 realme x will available offline and freedom sale starts august 1 sas 89
Next Stories
1 महाराष्ट्र सरकारच्या पथदर्शी प्रकल्पात मेगाभरती
2 पॉप-अप सेल्फी कॅमेरा, Oppo K3 चा फ्लॅश सेल; ‘या’ आहेत ऑफर्स
3 एटीएम वापरकर्त्यांसाठी खुशखबर, ‘हे’ शुल्क होणार कमी
Just Now!
X