24 January 2020

News Flash

बजेट स्मार्टफोन Realme 3i चा सेल, 5 हजार 300 रुपयांपर्यंतचा मिळू शकतो फायदा

डायमंड ब्ल्यू, डायमंड रेड, डायमंड ब्लॅक अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध

चीनच्या Realme कंपनीने गेल्या महिन्यात Realme 3i हा स्मार्टफोन लाँच केला होता. आज(दि.13) या स्मार्टफोनच्या विक्रीसाठी खास सेल आयोजित करण्यात आला आहे. फ्लिपकार्ट आणि Realme च्या संकेतस्थळावर दुपारी 12 वाजेपासून सेल सुरू होत असून यामध्ये काही आकर्षक ऑफर्स देखील आहेत.

ऑफर्स –
फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड आणि एचडीएफसी बँकेच्या डेबिट कार्डद्वारे किंवा अॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्डद्वारे हा स्मार्टफोन खरेदी केल्यास पाच टक्के सवलत मिळेल. याशिवाय Realme च्या संकेतस्थळावरुन हा फोन खरेदी केल्यास रिलायंस जिओच्या ग्राहकांना विविध प्रकारे पाच हजार 300 रुपयांपर्यंतचा फायदा आणि MobiKwik वापरणाऱ्यांना 10 टक्के ‘सुपरकॅश कॅशबॅक’ची ऑफरही आहे. जिओ आणि मोबिक्विकची ऑफर केवळ Realme च्या संकेतस्थळावरुन फोन खरेदी केल्यासच लागू असणार आहे.

फीचर्स – Realme 3i या स्मार्टफोनमध्ये 6.22 इंचाची ड्यूड्रॉप फुल स्क्रीन आहे. डायमंड-कट डिझाइनसह असलेला हा स्मार्टफोन डायमंड ब्ल्यू, डायमंड रेड, डायमंड ब्लॅक अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल. यात 4,230 mAh क्षमतेची बॅटरी असून एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर सलग 11 तास PUBG खेळता येणं शक्य आहे, याशिवाय 21 तास ब्राउझरवर इंटरनेटचा वापर आणि 13 तास YouTube चा वापर करता येणार आहे. या स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असून मागील बाजूला AI ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. यातील एक कॅमेरा 13 मेगापिक्सल तर दुसरा कॅमेरा दोन मेगापिक्सलचा आहे.

किंमत –
Realme 3i स्मार्टफोनमध्ये AI फेशियल आणि फिंगरप्रिंट अनलॉक फीचर आहे. हा स्मार्टफोन दोन रॅम व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. यातील 3GB रॅम+32GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत सात हजार 999 रुपये आहे, तर 4GB रॅम+64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत नऊ हजार 999 रुपये आहे.

First Published on August 13, 2019 8:58 am

Web Title: realme 3i goes on sale know all offers specifications and price sas 89
Next Stories
1 अशी करा जिओ फायबरसाठी नोंदणी
2 काय आहेत जिओ फायबरची वैशिष्ट्ये?
3 जाणून घ्या, बडिशेप खाण्याचे फायदे
Just Now!
X