चीनच्या Realme कंपनीने काही दिवसांपूर्वीच भारतात Realme 3i हा स्मार्टफोन लाँच केला होता. त्यानंतर आज पहिल्यांदाच हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. यासाठी फ्लिपकार्ट आणि Realme च्या संकेतस्थळावर दुपारी 12 वाजेपासून सेल आयोजित करण्यात आला आहे.

सेलमध्ये फोन खरेदी करणाऱ्यांसाठी काही आकर्षक ऑफर्स देखील आहेत. अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट अथवा डेबिट कार्डने फोन खरेदी केल्यास 5 टक्के सवलत आहे, तसंच नो-कॉस्ट इएमआयचा पर्याय देखील आहे. याशिवाय रिलायंस जिओच्या ग्राहकांना विविध प्रकारे 5 हजार 300 रुपयांपर्यंतचा फायदा आणि MobiKwik वापरणाऱ्यांना दीड हजार रुपयांपर्यंत सुपरकॅश ऑफर आहे. जिओ आणि मोबिक्विकची ऑफर केवळ Realme च्या संकेतस्थळावरुन फोन खरेदी केल्यासच लागू असणार आहे.

Realme 3i या स्मार्टफोनमध्ये 6.22 इंचाची ड्यूड्रॉप फुल स्क्रीन आहे. डायमंड-कट डिझाइनसह असलेला हा स्मार्टफोन डायमंड ब्ल्यू, डायमंड रेड, डायमंड ब्लॅक अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल. यात 4,230 mAh क्षमतेची बॅटरी असून एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर सलग 11 तास PUBG खेळता येणं शक्य आहे, याशिवाय 21 तास ब्राऊझरवर इंटरनेटचा वापर आणि 13 तास YouTube चा वापर करता येणार आहे. या स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असून मागील बाजूला AI ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. यातील एक कॅमेरा 13 मेगापिक्सल तर दुसरा कॅमेरा 2 मेगापिक्सलचा आहे.

किंमत –
Realme 3i स्मार्टफोनमध्ये AI फेशियल आणि फिंगरप्रिंट अनलॉक फीचर आहे. हा स्मार्टफोन दोन रॅम व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. यातील 3GB रॅम+32GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 7 हजार 999 रुपये आहे, तर 4GB रॅम+64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 9 हजार 999 रुपये आहे.