News Flash

मागील बाजूला चार कॅमेरे ; Realme 5 चा भारतात पहिलाच ‘सेल’

क्रिस्टल ब्ल्यू आणि क्रिस्टल पर्पल या दोन रंगांमध्ये उपलब्ध

चीनची कंपनी Realme ने गेल्या आठवड्यात भारतात आपले दोन नवे स्मार्टफोन Realme 5 Pro आणि Realme 5 लाँच केले होते. यातील Realme 5 स्मार्टफोनसाठी आज पहिल्यांदाच सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. फ्लिपकार्ट आणि रिअलमीच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी 12 ते रात्री 8 वाजेपर्यंत हा सेल असणार आहे. सेलमध्ये अनेक आकर्षक ऑफर्स देखील आहेत.  तर Realme 5 Pro साठी 4 सप्टेंबर रोजी पहिला सेल आयोजित केला जाणार आहे.

ऑफर्स – फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड किंवा अ‍ॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्डद्वारे हा फोन खरेदी केल्यास पाच टक्के कॅशबॅकची ऑफर आहे.  रिअलमीच्या संकेतस्थळावरुन खरेदी केल्यास जिओच्या ग्राहकांना विविध प्रकारे 7 हजार रुपयांपर्यंतचा फायदा मिळेल. Paytm UPI द्वारे खरेदी केल्यास दोन हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक आणि Mobikwik द्वारे पेमेंट केल्यास 10 टक्के किंवा 1,500 रुपयांपर्यंत सुपरकॅश मिळेल.

Realme 5 फीचर्स –
कंपनीने Realme 5 स्मार्टफोन क्रिस्टल डिझाइनसह आणला आहे. हा स्मार्टफोन क्रिस्टल ब्ल्यू आणि क्रिस्टल पर्पल या रंगांमध्ये उपलब्ध असून या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंच स्क्रीन आहे. याच्या मागील बाजूलाही चार कॅमेरे आहेत. यातील 12 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असून दुसरा कॅमेरा 8 मेगापिक्सलचा आहे. तर अन्य दोन कॅमेरे 2 मेगापिक्सलचे आहेत. सेल्फीसाठी यामध्ये 13 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये 5,000 mAh क्षमतेची पावरफुल बॅटरी असून क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसर देण्यात आलं आहे.

Realme 5 किंमत –
या फोनची किंमत 9 हजार 999 (3 जीबी रॅम, 32 जीबी स्टोरेज) रुपयांपासून सुरू होते. 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजवाल्या रिअलमी 5 ची किंमत 10 हजार 999 रुपये आहे. 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 11 हजार 999 रुपये आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 3:17 pm

Web Title: realme 5 go for the first sale in india know price offers and all specifications sas 89
Next Stories
1 Hero Electric ने लाँच केली Dash ई-स्कूटर
2 Ganapati Utsav 2019 : असे करा ड्रायफ्रूट मोदक
3 झुरळांपासून सुटका हवी आहे ? करून पहा ‘हे’ घरगुती उपाय
Just Now!
X