17 January 2021

News Flash

Realme : 48 मेगापिक्सलसह 4 कॅमेरा असलेल्या फोनवर डिस्काउंट, मिळेल दमदार बॅटरी

Realme चा शानदार फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी

रिअलमी कंपनीचा चार कॅमेरे असलेला Realme 5 Pro हा फोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर या फोनच्या खरेदीसाठी आकर्षक ऑफर आहेत. हा फोन 4GB रॅम आणि 6GB रॅम अशा दोन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. जाणून घेऊया कोणत्या ऑफर्सचा लाभ घेता येईल –

फीचर्स :- Realme 5 Pro मध्ये 6.3 इंच FHD+ ड्यूड्रॉप फुल स्क्रीन डिस्प्ले आहे. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 712 प्रोसेसर असलेल्या या फोनची खासियत म्हणजे याचा कॅमेरा. या पोनच्या मागील बाजूला चार कॅमेरे आहेत. यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असून त्यासोबत 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड लेंस, 2 मेगापिक्सलचा पोट्रेट लेंस आणि 2 मेगापिक्सलचा अल्ट्रा मॅक्रो लेंस आहे. तर, सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा असून फोनमध्ये 4,035 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

आणखी वाचा- चार कॅमेऱ्यांचा Oppo A9 2020 स्मार्टफोन झाला स्वस्त, ‘ही’ आहे नवी किंमत

ऑफर :- रिअलमी 5 प्रोच्या बेसिक व्हेरिअंटची(4GB रॅम + 64GB स्टोरेज) किंमत 13 हजार 999 रुपये आहे. पण कंपनीच्या संकेतस्थळावर या फोनच्या खरेदीवर एक हजार रुपयांती सवलत दिली जात आहे. त्यामुळे हा फोन 12 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तर, 14 हजार 999 रुपयांमध्ये लाँच केलेला 6GB रॅम आणि 64GB व्हेरिअंटचा फोन 13 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय ग्राहकांना mobikwik कडून 10% सुपर कॅश मिळेल. तसेच, एक्सचेंज ऑफरअंतर्गत 500 रुपयांची सूट आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2020 11:51 am

Web Title: realme 5 pro discount price cut know specifications new price and other details sas 89
Next Stories
1 गेमर्ससाठी संधी! POCO X2 स्मार्टफोनचा आज सेल, ‘या’ आहेत ऑफर
2 राज ठाकरेंचं भाकित खरं ठरलं? मोदींच्या ‘त्या’ ट्वीटनंतर व्हायरल झाली पोस्ट
3 अमृता फडणवीस यांनीही दिले सोशल मीडिया सोडण्याचे संकेत
Just Now!
X