19 February 2020

News Flash

मागील बाजूला चार कॅमेरे ; Realme 5 Proचा खास सेल

स्पार्कलिंग ब्ल्यू, क्रिस्टल ग्रीन अशा दोन रंगांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध

Realme कंपनीने गेल्या महिन्यात मागील बाजूला चार कॅमेरे असलेले Realme 5 Pro आणि Realme 5  हे दोन स्मार्टफोन लाँच केले होते. यातील Realme 5 Pro या स्मार्टफोनसाठी आज(दि.11) खास सेलचं आयोजन करण्यात आलं असून फ्लिपकार्ट आणि Realme.com या संकेतस्थळांवर दुपारी 12 वाजेपासून हा सेल सुरू होईल.

ऑफर – या सेलमध्ये काही खास आकर्षक ऑफर्स देखील आहेत. एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे हा फोन खरेदी केल्यास 750 रुपयांची सवलत मिळेल. याशिवाय अन्य कोणत्याही डेबिट अथवा क्रेडिट कार्डद्वारे इएमआय ट्रांजेक्शनवर अतिरिक्त 250 रुपयांची सवलत मिळेल.

Realme 5 Pro किंमत –
Realme 5 Pro या स्मार्टफोनची किंमत 13 हजार 999 रुपयांपासून सुरू होते. ही किंमत 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिअंटची आहे. Realme 5 Pro च्या 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 14 हजार 999 रुपये आहे. तर, 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजच्या व्हेरिअंटची किंमत 16 हजार 999 रुपये आहे.

Realme 5 Pro चे फीचर्स –
या स्मार्टफोनमध्ये 6.3 इंच FHD+ ड्यूड्रॉप फुल स्क्रीन आहे. मागील बाजूला चार कॅमेरे असून त्यातील एक 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. याशिवाय एक कॅमेरा 8 मेगापिक्सल आणि अन्य दोन कॅमेरे 2 मेगापिक्सलचे आहेत. सेल्फीसाठी पुढील बाजूला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 712 प्रोसेसर आहे. Realme 5 Pro स्पार्कलिंग ब्ल्यू, क्रिस्टल ग्रीन अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल. या स्मार्टफोनमध्ये 4,035 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

First Published on September 11, 2019 9:16 am

Web Title: realme 5 pro to go on sale know price offers specifications and more sas 89
Next Stories
1 बहुप्रतिक्षित iphone 11 सीरिज लाँच; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
2 Jio ला टक्कर, व्होडाफोनचा 59 रुपयांचा प्लॅन; दररोज 1GB डेटा
3 Apple Event 2019 : आयफोन 11 सह ‘हे’ प्रोडक्ट्स होणार लाँच ?
Just Now!
X