Realme कंपनीने आपल्या अजून दोन स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ केली आहे. Realme 5i आणि Realme 6 च्या किंमतीत पुन्हा वाढ झाली आहे. दोन्ही फोनच्या किंमतीत 1,000 रुपयांची वाढ झाली असून नवीन किंमती कंपनीच्या वेबसाइटवर अपडेट करण्यात आल्या आहेत. Realme 5i हा फोन जानेवारीमध्ये, तर Realme 6 हा फोन मार्च महिन्यात भारतात लाँच झाले आहेत.

Realme 5i आणि Realme 6 हो दोन्ही फोन 1,000 रुपयांनी महाग झाले आहेत. Realme 5i च्या बेसिक व्हेरिअंटची किंमत (4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज) आता 10,999 रुपये झाली आहे. तर, मार्च महिन्यात लाँच झालेल्या 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटच्या किंमतीत वाढ झाली नसून अध्यापही हे मॉडेल 11,999 रुपयांमध्ये वेबसाइटवर उपलब्ध आहे. दुसरीकडे, Relame 6 च्या बेसिक व्हेरिअंटची किंमत आधी 13,999 रुपये (4 जीबी रॅम + 64 स्टोरेज) होती, पण आता वाढ झाल्याने याची किंमत 14,999 रुपये झाली आहे. तर, या फोनच्या 6 जीबी रॅम + 128 जीबी व्हेरिअंटची किंमत आता 16,999 रुपये, आणि 8 जीबी रॅम + 128 जीबी व्हेरिअंटची किंमत आता 17,999 रुपये झाली आहे.

अन्य रिअलमी फोनच्या किंमतीही वाढल्या :-
गेल्या आठवड्यातच Realme Narzo 10A आणि Realme C3 च्या किंमतीतही कंपनीने वाढ केली होती. Realme Narzo 10A च्या बेसिक व्हेरिअंटची किंमत 500 रुपयांनी वाढून आता 8,999 रुपये झाली आहे. तर, काही दिवसांपूर्वीच लाँच झालेल्या 4 जीबी रॅम + 64 जीबी व्हेरिअंटच्या किंमतीत अद्याप बदल झालेला नाही. दुसरीकडे, रिअलमी सी3 या फोनच्या 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज मॉडेल आणि 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज मॉडेलही 1,000 रुपयांनी महाग झालेत. दोन्ही मॉडेल्सची किंमत आता अनुक्रमे 8,999 रुपये आणि 9,999 रुपये झाली आहे.