Realme कंपनीने नव्या वर्षातील आपला पहिला स्मार्टफोन Realme 5i लाँच केलाय. हा बहुचर्चित स्मार्टफोन सध्या केवळ व्हिएतनाममध्ये लाँच करण्यात आला असून 9 जानेवारी रोजी हा फोन भारतात लाँच होईल. या फोनचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप दिलाय. तसंच सेल्फीसाठी यामध्ये 8 मेगापिक्सलचा सेंसर आहे. याशिवाय फोनमध्ये 5,000mAh क्षमतेची दमदार बॅटरीही आहे.

AI क्वॉडकॅमेरा सेटअप –
या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी AI क्वॉडकॅमेरा सेटअप मिळेल. यातील पहिला कॅमेरा 12 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेंसरसह, दुसरा कॅमेरा 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल लेंस, तिसरा कॅमेरा 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि चौथा कॅमेरा 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंससह आहे.

किंमत –
हा स्मार्टफोन 3GB आणि 4GB रॅम अशा दोन व्हेरिअंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. व्हिएतनाममध्ये या फोनच्या 3GB व्हेरिअंटची किंमत 3,690,000 VND म्हणजे जवळपास 11 हजार 500 रुपये, तर 4GB व्हेरिअंटची किंमत 4,290,000 VND म्हणजे जवळपास 13 हजार 500 रुपये ठेवण्यात आली आहे. भारतातही जवळपास इतकीच किंमत असण्याची शक्यता आहे. मिनी ड्रॉप डिझाइनसह फुल स्क्रीन डिस्प्ले असलेला हा स्मार्टफोन फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावर विक्रीसाठी उपलब्ध असेल. हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसरसह अँड्रॉइड 9 पायवर आधारित ColorOS 6.0.1 वर कार्यरत असेल. 3जीबी रॅम+32जीबी स्टोरेज आणि 4जीबी रॅम+64जीबी स्टोरेज अशा दोन व्हेरिअंट्समध्ये हा फोन उपलब्ध असेल.