रिअलमी कंपनीचे दोन स्मार्टफोन आता स्वस्त झाले आहेत. कंपनीने आपल्या Realme 6 आणि Reame 6i या दोन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. दोन्ही फोन 1,000 रुपयांनी स्वस्त झालेत. पण, कंपनीने Realme 6i च्या दोनपैकी एकाच व्हेरिअंटच्या किंमतीत कपात केली आहे. कंपनीने Realme 6 हा स्मार्टफोन मार्च महिन्यात, तर Realme 6i जुलै महिन्यात भारतात लाँच केला आहे.

Realme 6 नवीन किंमत आणि फीचर्स –
हा स्मार्टफोन Comet White आणि Comet Blue या दोन कलरच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये 6.5 इंच पंच-होल डिस्प्ले असून यात MediaTek Helio G90T प्रोसेसर दिले आहे. Realme 6 च्या मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. यात 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सल पोर्ट्रेट लेन्स आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स आहे. तर, सेल्फीसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा इन-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा आहे. या कॅमेऱ्याला AI ब्युटी मोड, पोर्ट्रेट मोड, HDR सेल्फी मोड दिले आहेत. Realme 6 मध्ये 4,300 mAh ची बॅटरी आणि 30W फ्लॅश चार्जर असून एका तासात बॅटरी पूर्ण चार्ज होते असा कंपनीचा दावा आहे. किंमतीत झालेल्या कपातीनंतर आता रिअलमी 6 च्या बेसिक व्हेरिअंट 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेजची किंमत 13,999 रुपये झाली आहे. तर,  6 जीबी रॅम + 64 जीबी व्हेरिअंटची किंमत 14,999 रुपये झाली आहे.  याशिवाय 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज मॉडेल आणि 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत अनुक्रमे 15,999 रुपये व 16 हजार 999 रुपये झाली आहे.

Realme 6i नवीन किंमत आणि फीचर्स –
हा फोन 4जीबी रॅम+64जीबी स्टोरेज आणि 6जीबी रॅम+64जीबी स्टोरेज अशा दोन व्हेरिअंट्समध्ये येतो. ऑपरेटिंग सिस्टिम ‘अँड्रॉइड 10’ वर आधारित असलेल्या या फोनमध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले आहे. 6जीबीपर्यंत रॅमचा पर्याय असलेल्या या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G90T SoC प्रोसेसर आहे. फोनमधील 64जीबी स्टोरेज माइक्रो एसडी कार्डद्वारे 256जीबीपर्यंत वाढवता येईल. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये मागील बाजूला चार कॅमेरे आहेत. यात 48 मेगापिक्सेलचा प्राइमरी सेन्सरसोबत एक 8 मेगापिक्सेलचा आणि अन्य दोन 2 मेगापिक्सेलचे कॅमेरे आहेत. तर, सेल्फीसाठी 16 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. याशिवाय, फोनमध्ये 30W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,300 mAh ची बॅटरी आहे. साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर असलेल्या या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, 4G LTE, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/A-GPS, ग्लोनास आणि युएसबी टाइप-C चार्जिंग पोर्ट यांसारखे फीचर्स आहेत. Realme 6i हा फोन 4जीबी रॅम+64जीबी स्टोरेज आणि 6जीबी रॅम+64जीबी स्टोरेज अशा दोन व्हेरिअंट्समध्ये येतो. या फोनच्या 4जीबी रॅम+64जीबी स्टोरेज व्हेरिअंटच्या किंमतीत कपात झालेली नाही. त्यामुळे याची किंमत आधीप्रमाणेच 12 हजार 999 रुपये आहे. तर, 6जीबी रॅम+64जीबी स्टोरेज व्हेरिअंटच्या किंमतीत मात्र एक हजार रुपयांची कपात झाली आहे. त्यामुळे हा फोन आता 13 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.