Realme 6 चा पहिला सेल आज, बुधवारी ११ मार्च रोजी दुपारी १२ वाजता आहे. ई-कॉमर्स संकेतस्थळ फ्लिपकार्ट आणि realme.com वर विक्रीसाठी सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. Flipkart वर या स्मार्टफोनच्या पहिल्या सेलमध्ये Axis बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डवर 1,000 रुपये इंस्टंट डिस्काउंट मिळेल. तर ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवर ७५० रूपयांची सूट मिळणार आहे.

Realme 6 फीचर्स –
हा स्मार्टफोन Comet White आणि Comet Blue या दोन कलरच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये 6.5 इंच पंच-होल डिस्प्ले असून यात MediaTek Helio G90T प्रोसेसर दिले आहे. Realme 6 च्या मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. यात 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सल पोर्ट्रेट लेन्स आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स आहे. तर, सेल्फीसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा इन-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा आहे. या कॅमेऱ्याला AI ब्युटी मोड, पोर्ट्रेट मोड, HDR सेल्फी मोड दिले आहेत. Realme 6 मध्ये 4,300 mAh ची बॅटरी आणि 30W फ्लॅश चार्जर असून एका तासात बॅटरी पूर्ण चार्ज होते असा कंपनीचा दावा आहे.

किंमत –
Realme 6 च्या 4जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 12 हजार 999 रुपये, 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 14 हजार 999 रुपये आणि 8जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 15 हजार 999 रुपये आहे.