रिअलमी कंपनीने आपला Realme 6 हा स्मार्टफोन भारतात अजून एका नवीन व्हेरिअंटमध्ये आणला आहे. हा स्मार्टफोन मार्च महिन्यात तीन व्हेरिअंटमध्ये (4 जीबी + 64 जीबी, 6 जीबी + 128 जीबी, आणि 8 जीबी + 128 जीबी) लाँच झाला होता. आता या स्मार्टफोनसाठी कंपनीने 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेजचं नवीन व्हेरिअंट लाँच केलं आहे. प्लिपकार्टवर नवीन व्हेरिअंटमधील Realme 6 हा फोन खरेदी करता येईल.

Realme 6 फीचर्स :–
एकूण पाच कॅमेरे असलेला हा स्मार्टफोन Comet White आणि Comet Blue या दोन कलरच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये 6.5 इंच पंच-होल डिस्प्ले असून यात MediaTek Helio G90T प्रोसेसर दिले आहे. Realme 6 च्या मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. यात 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सल पोर्ट्रेट लेन्स आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्स आहे. तर, सेल्फीसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा इन-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा आहे. या कॅमेऱ्याला AI ब्युटी मोड, पोर्ट्रेट मोड, HDR सेल्फी मोड दिले आहेत. Realme 6 मध्ये 4,300 mAh ची बॅटरी आणि 30W फ्लॅश चार्जर असून एका तासात बॅटरी पूर्ण चार्ज होते असा कंपनीचा दावा आहे.

किंमत :-
Realme 6 च्या 4जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 14 हजार 999 रुपये, 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 16 हजार 999 रुपये आणि 8जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 17 हजार 999 रुपये आहे. तर, नवीन 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 15 हजार 999 रुपये इतकी आहे.