Realme कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर ‘रिअलमी डेज सेल’ आयोजित केला आहे. या सेलमध्ये कंपनीच्या अनेक प्रोडक्ट्सवर डिस्काउंट मिळू शकतं. या प्रोडक्ट्समध्ये स्मार्टफोन्ससोबतच स्मार्ट टीव्ही मॉडेल्सचाही समावेश आहे. हा सेल 29 जानेवारीपर्यंत सुरू असेल. याच सेलमध्ये Realme 6i हा स्मार्टफोनही स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे.

फिचर्स :-
Realme 6i हा फोन 4जीबी रॅम+64जीबी स्टोरेज आणि 6जीबी रॅम+64जीबी स्टोरेज अशा दोन व्हेरिअंट्समध्ये येतो. ऑपरेटिंग सिस्टिम ‘अँड्रॉइड 10’ वर आधारित असलेल्या या फोनमध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले आहे. 6जीबीपर्यंत रॅमचा पर्याय असलेल्या या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G90T SoC प्रोसेसर आहे. फोनमधील 64जीबी स्टोरेज माइक्रो एसडी कार्डद्वारे 256जीबीपर्यंत वाढवता येईल. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये मागील बाजूला चार कॅमेरे आहेत. यात 48 मेगापिक्सेलचा प्राइमरी सेन्सरसोबत एक 8 मेगापिक्सेलचा आणि अन्य दोन 2 मेगापिक्सेलचे कॅमेरे आहेत. तर, सेल्फीसाठी 16 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. याशिवाय, फोनमध्ये 30W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,300 mAh ची बॅटरी आहे. साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर असलेल्या या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, 4G LTE, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/A-GPS, ग्लोनास आणि युएसबी टाइप-C चार्जिंग पोर्ट यांसारखे फीचर्स आहेत.

किंमत आणि ऑफर :
Realme 6i हा स्मार्टफोन भारतात गेल्या वर्षी जुलै महिन्यात लाँच झाला होता. सेलमध्ये या फोनवर 2,000 रुपयांची सूट मिळेल. ग्राहक डिस्काउंटसह 10,999 रुपयांच्या बेसिक किंमतीत Realme 6i (4GB+64GB व्हेरिअंट) खरेदी करु शकतात. याची जुनी किंमत 12,999 रुपये होती. अशाचप्रकारे 6GB+64GB व्हेरिअंट 13,999 रुपयांऐवजी 11,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.