रिअलमी कंपनीचा 48MP क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप असलेला ‘बजेट’ स्मार्टफोन Realme 6i चा आज (दि.13) पुन्हा एकदा सेल आयोजित करण्यात आला आहे. या फोनसाठी दुपारी 12 वाजेपासून रिअलमीची अधिकृत वेबसाईट आणि फ्लिपकार्टवर सेलला सुरुवात होईल. हा फोन 4जीबी रॅम+64जीबी स्टोरेज आणि 6जीबी रॅम+64जीबी स्टोरेज अशा दोन व्हेरिअंट्समध्ये येतो. सेलमध्ये फोनच्या खरेदीवर काही आकर्षक ऑफरही आहेत. सेलमध्ये ‘फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड’द्वारे हा फोन खरेदी केल्यास पाच टक्के कॅशबॅक मिळेल. याशिवाय, ‘अ‍ॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्ड’वरही पाच टक्के सवलत आहे. 1,445 रुपये नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय देखील आहे. तसेच, Realme.com वरुन हा फोन खरेदी करताना Mobikwik अ‍ॅपवरून पेमेंट केल्यास 500 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

फीचर्स :-
ऑपरेटिंग सिस्टिम ‘अँड्रॉइड 10’ वर आधारित असलेल्या या फोनमध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले आहे. 6जीबीपर्यंत रॅमचा पर्याय असलेल्या या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G90T SoC प्रोसेसर आहे. फोनमधील 64जीबी स्टोरेज माइक्रो एसडी कार्डद्वारे 256जीबीपर्यंत वाढवता येईल. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये मागील बाजूला चार कॅमेरे आहेत. यात 48 मेगापिक्सेलचा प्राइमरी सेन्सरसोबत एक 8 मेगापिक्सेलचा आणि अन्य दोन 2 मेगापिक्सेलचे कॅमेरे आहेत. तर, सेल्फीसाठी 16 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. याशिवाय, फोनमध्ये 30W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,300 mAh ची बॅटरी आहे. साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर असलेल्या या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, 4G LTE, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/A-GPS, ग्लोनास आणि युएसबी टाइप-C चार्जिंग पोर्ट यांसारखे फीचर्स आहेत.

किंमत :-
Realme 6i हा फोन 4जीबी रॅम+64जीबी स्टोरेज आणि 6जीबी रॅम+64जीबी स्टोरेज अशा दोन व्हेरिअंट्समध्ये येतो. 4जीबी रॅम+64जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 12 हजार 999 रुपये आहे. तर, 6जीबी रॅम+64जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 14 हजार 999 रुपये आहे.