30 October 2020

News Flash

6GB रॅम असलेल्या Realme च्या ‘बजेट’ स्मार्टफोनचा सेल, शानदार ऑफर्सही

48MP क्वॉड रिअर कॅमेरा सेटअपसोबत सेल्फीसाठी 16 मेगापिक्सेलचा कॅमेराही

रिअलमी कंपनीने भारतात गेल्या महिन्यात 48MP क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप असलेला ‘बजेट’ स्मार्टफोन Realme 6i लाँच केला होता. आज(दि.20) या फोनसाठी खास ‘सेल’चं आयोजन करण्यात आलं आहे. या फोनसाठी दुपारी 12 वाजेपासून रिअलमीची अधिकृत वेबसाईट आणि ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टच्या वेबसाइटवर सेलला सुरुवात होत आहे.

ऑफर्स :-
Realme 6i हा फोन 4जीबी रॅम+64जीबी स्टोरेज आणि 6जीबी रॅम+64जीबी स्टोरेज अशा दोन व्हेरिअंट्समध्ये येतो. सेलमध्ये फोनच्या खरेदीवर काही आकर्षक ऑफरही आहेत. सेलमध्ये ‘फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड’द्वारे हा फोन खरेदी केल्यास पाच टक्के कॅशबॅक मिळेल. याशिवाय, ‘अ‍ॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्ड’वरही पाच टक्के सवलत आहे. 1,445 रुपये नो-कॉस्ट ईएमआयचा पर्याय देखील आहे. तसेच, Realme.com वरुन हा फोन खरेदी करताना Mobikwik अ‍ॅपवरून पेमेंट केल्यास 500 रुपये कॅशबॅक मिळेल.

फीचर्स :-
ऑपरेटिंग सिस्टिम ‘अँड्रॉइड 10’ वर आधारित असलेल्या या फोनमध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले आहे. 6जीबीपर्यंत रॅमचा पर्याय असलेल्या या फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G90T SoC प्रोसेसर आहे. फोनमधील 64जीबी स्टोरेज माइक्रो एसडी कार्डद्वारे 256जीबीपर्यंत वाढवता येईल. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये मागील बाजूला चार कॅमेरे आहेत. यात 48 मेगापिक्सेलचा प्राइमरी सेन्सरसोबत एक 8 मेगापिक्सेलचा आणि अन्य दोन 2 मेगापिक्सेलचे कॅमेरे आहेत. तर, सेल्फीसाठी 16 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. याशिवाय, फोनमध्ये 30W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,300 mAh ची बॅटरी आहे. साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर असलेल्या या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, 4G LTE, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/A-GPS, ग्लोनास आणि युएसबी टाइप-C चार्जिंग पोर्ट यांसारखे फीचर्स आहेत.

किंमत :-
Realme 6i हा फोन 4जीबी रॅम+64जीबी स्टोरेज आणि 6जीबी रॅम+64जीबी स्टोरेज अशा दोन व्हेरिअंट्समध्ये येतो. 4जीबी रॅम+64जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 12 हजार 999 रुपये आहे. तर, 6जीबी रॅम+64जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 14 हजार 999 रुपये आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2020 11:50 am

Web Title: realme 6i with 4300mah battery to go on sale today via flipkart check price offers and specifications sas 89
Next Stories
1 पाच कॅमेऱ्यांचा ‘बजेट’ स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी, फोनमध्ये आहे 5,020mAh ची दमदार बॅटरीही
2 64 MP कॅमेरा + 5000mAh बॅटरी; मोटोरोलाच्या One Fusion+ चा आज ‘सेल’, जाणून घ्या ऑफर्स
3 OnePlus ने लाँच केलं नवीन ‘मेड इन इंडिया’ फीचर, जाणून घ्या डिटेल्स
Just Now!
X