‘रिअलमी’चा लेटेस्ट बजेट स्मार्टफोन Realme 7 आज सेलमध्ये खरेदी करण्याची संधी आहे. गेल्या महिन्यात Realme 7 Pro या स्मार्टफोनसोबत याला लाँच करण्यात आलं होतं. ट्रिपल रिअर कॅमेरा, 5000mAh क्षमतेची मोठी बॅटरी आणि रिव्हर्स चार्जिंगसारखे फीचर्स असलेला हा स्मार्टफोन आज दुपारी १२ वाजेपासून ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट आणि Realme.com या संकेतस्थळावर सेलमध्ये उपलब्ध असेल.

Realme 7 या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G95 प्रोसेसरही आहे. हा स्मार्टफोन ग्राहकांना मिस्ट ब्लू आणि मिस्ट वाइट या दोन रंगामध्ये उपलबद्ध आहे. 6GB + 64GB वेरिएंटच्या स्मार्टफोनची किंमत १४,९९९ रुपये तर 8GB + 128GB वेरिएंटच्या स्मार्टफोनची किंमत १६,९९९ रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. आजच्या सेलमधील ऑफरबद्दल बोलायचं झाल्यास ग्राहकांना फ्लिपकार्ट एक्सिस बँक क्रेडिट कार्डवर पाच टक्के अनलिमिटेड कॅशबॅक आणि एक्सिस बँक बज क्रेडिट कार्डवर १० टक्केंची सूट मिळणार आहे. यासोबतच ग्राहकांना नो-कॉस्ट EMI चा पर्यायही देण्यात आला आहे.

Realme 7 फीचर्स –
– अँड्रॉयड 10 बेस्ड Realme UI
– 90Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंच फुल-HD+ (1,080×2,400 पिक्सल) डिस्प्ले आणि ऑक्टा-कोर MediaTek Helio G95 प्रोसेसर
– 64MP क्वॉड कॅमरा सेटअप आणि सेल्फीसाठी 16MP कॅमरा
– फिंगरप्रिंट सेंसर
– 30W फास्ट चार्जिंगसह 5,000mAh बॅटरी
– 4G VoLTE
– Wi-Fi 802.11ac
– ब्लूटूथ v5.0, GPS/ A-GPS
– USB टाइप-C पोर्ट सपोर्ट