News Flash

64MP कॅमऱ्याचा Realme 7i ‘या’ दमदार फिचर्ससह भारतात लाँच

जाणून घ्या... काय आहेत फिचर्स आणि किंमत

Best Smartphones under 15000 : स्मार्टफोन्स निर्माता कंपनी Realme ने आपला 7 series मधील लेटेस्ट 7i स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. 7 series अंतर्गत कंपनीने यापूर्वीच Realme 7 आणि Realme 7 Pro स्मार्टफोन लाँच केले आहेत. Realme Phone ला दोन रंगामध्ये लाँच करण्यात आलं आहे. यामध्ये फ्यूजन ग्रीन आणि फ्यूजन ब्लू या रंगाचा समावेश आहे. Realme 7i चा सेल 16 ऑक्टोबर रोजी Flipkart आणि रियलमी इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर आहे. Realme 7i या स्मार्टफोन्सच्या वैशिष्ट्याबद्दल बोलायचं झाल्यास… फोन्समध्ये क्वाड रियर कॅमरा सेटअप, हाय रिफ्रेश रेट स्क्रीन आणि ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. पाहूयात Realme 7i या स्मार्टफोन्सची किंमत, फिचर्स आणि सेलची तारिख….

Realme 7i Specifications
सॉफ्टवेयर आणि डिस्प्ले: ड्युअल-सिम (नॅनो) असणारा हा स्मार्टफोन अँड्रॉयड 10 वर अधारित आहे. रियल मीचा हा स्मार्टफोनला 6.5 इंच एचडी+ (720×1,600 पिक्सल) डिस्प्ले आहे. याचा स्क्रीन टू बॉडी रेशियो 90 टक्के आणि रिफ्रेश रेट 90 हर्ट्ज इतका आहे.

Realme 7i Processor, रॅम आणि स्टोरेज:
स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी स्नॅपड्रॅगन 662 ऑक्टा-कोर प्रोसेसरसह 4 जीबी रॅम आणि 128 जीबीपर्यंत स्टोरेज आहे. (यूएफएस 2.1 स्टोरेज) मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवता येईल.

कनेक्टिव्हिटी :
फोनमध्ये एलटीई, ड्युअल-बँड वाय-फाय, एनएफसी, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ ए-जीपीएस, ग्लोनास आणि 3.5 मिलीमीटर हेडफोन जॅकचा समावेश आहे. सिक्युरिटीसाठी स्मार्टफोन्सच्या मागील बाजूस फिंगर फ्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

बॅटरी :
Realme Mobile स्मार्टफोन्समध्ये 5,000 एमएएचची बॅट आहे. ही बॅटरी 18 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.

कॅमरा डिटेल्स :
या स्मार्टफोन्सच्या मागील बाजूला चार रिअर कॅमरे देण्यात आले आहेत. 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमरा, अपर्चर एफ/1.8 आहे. सोबतच 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड एंगल लेन्सही आहे. 2 मेगापिक्सल मोनोक्रोम कॅमरा सेन्सर, अपर्चर एफ/2.4 आणि 2 मेगापिक्सल मायक्रो कॅमरा सेन्सर, अपर्चर एफ/2.4 आहे. तसेच सेल्फीसाठी 16 मेगापिक्सल Sony IMX471 सेन्सर, अपर्चर एफ/2.1 देण्यात आला आहे.

Realme 7i Price in India
Realme 7i चा 4 जीबी रॅम/64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. तर याच स्मार्टफोन्सच्या 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत १२ हजार ९९९ रुपये इतकी आहे.

आणखी वाचा :

Amazon Great Indian Festival 2020 :जाणून घ्या ऑफर्स, वेळ आणि काय काय खरेदी करण्याची आहे संधी

बंपर ऑफर्स! ५५ हजार रुपयांचा फोन फक्त २० हजार रुपयांत

‘या’ लॅपटॉपवर तब्बल ४५ हजार रुपयांची सूट

Samsung च्या ‘या’ फोन्सवर ३० हजारांची सूट, जाणून घ्या भन्नाट ऑफरबद्दल

Flipkart Big Billion Day 2020 : जाणून घ्या ऑफर्स, वेळ आणि काय काय खरेदी करण्याची आहे संधी

भन्नाट ऑफर : ७० टक्के रक्कम द्या अन् सॅमसंगचा नवीन स्मार्टफोन घरी घेऊन जा

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2020 1:36 pm

Web Title: realme 7i with snapdragon 662 soc 90hz refresh rate launched in india price specifications nck 90
Next Stories
1 सीताफळ जरूर खा, पण नेमकं कधी…
2 Amazon Great Indian Festival 2020 :जाणून घ्या ऑफर्स, वेळ आणि काय काय खरेदी करण्याची आहे संधी
3 दरवर्षी नवीन गाडीची ‘हौस’
Just Now!
X