News Flash

Realme Band चा आज पहिला सेल, मिळेल बंपर डिस्काउंट

फिटनेसचे अनेक प्रीमियम फीचर्स...

रिअलमी कंपनीचा लेटेस्ट फिटनेस बँड ‘Realme Band’ ची आज(दि.९) पहिल्यांदा विक्री होत आहे. या बँडच्या विक्रीसाठी कंपनीकडून ई-कॉमर्स संकेतस्थळ अॅमेझॉन आणि realme.com वर आज पहिल्या सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. दुपारी १२ वाजेपासून सेलला सुरुवात झाली असून या सेलमध्ये काही आकर्षक ऑफर्सही आहेत. कंपनीने हा बँड काही दिवसांपूर्वीच लाँच केला होता. जाणून घेऊया या बँडची खासियत आणि किंमत –

Realme Band स्पेसिफिकेशन्स :-
Realme Band कंपनीचा पहिला स्मार्ट बँड असून यामध्ये 2.4cm चा कलर डिस्प्ले आहे. नऊ स्पोर्ट्स मोड असलेल्या या बँडमध्ये पाच स्टायलिश डायल फेस मिळतील. तसेच क्रिकेट मोडचाही समावेश यामध्ये आहे. याशिवाय, बँडमध्ये पाणी पिण्याची आठवण देणारे वॉटर रिमाइंड, हार्ट रेट मॉनिटर, स्मार्ट नोटिफिकेशन, स्लीप मॉनिटरिंग हे फीचर मिळतील. या बँडला वॉटरप्रूफ आणि डस्टसाठी IP68 रेटिंग मिळाले आहे, म्हणजेच हा बँड वॉटरप्रूफ असून चार्जिंगसाठी युएसबी पोर्ट किंवा अॅडप्टरच्या मदतीने चार्जिग करता येईल.

किंमत आणि ऑफर्स :-
रिअलमीने या फिटनेस बँडची किंमत 1,499 रुपये ठेवली आहे. तर, एचएसबीसी क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे हा बँड खरेदी केल्यास 10 टक्के डिस्काउंट मिळेल. बँडच्या खरेदीसाठी नो-कॉस्ट ईएमआयचा पर्यायही आहे. याशिवाय, एचएसबीसीच्या कॅशबॅक कार्डद्वारे खरेदी केल्यास ५ टक्के इंस्टंट डिस्काउंट आणि ‘अॅमेझॉन पे’द्वारे पेमेंट केल्यास 50 रुपये कॅशबॅकची ऑफर आहे. हा बँड ब्लॅक, ग्रीन आणि येलो अशा तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2020 12:50 pm

Web Title: realme band first sale india via amazon and realme websites knoe price offers specifications and all other details sas 89
Next Stories
1 Alert ! अन्यथा डेबिट-क्रेडिट कार्डची ही सेवा होणार बंद
2 Volkswagen ची ‘ढासू’ SUV झाली लाँच , Fortuner ला देणार टक्कर
3 ‘व्होडाफोन-आयडिया’ची धमाकेदार ऑफर, ‘या’ तीन प्लॅनमध्ये दररोज दुप्पट डेटा
Just Now!
X