29 September 2020

News Flash

Realme C1(2019) चा पहिला सेल आज, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

खिशाला परवडणाऱ्या दरात खरेदी करता येणार

इ-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर आज Realme C1(2019) चा पहिला सेल आयोजित करण्यात आला आहे. Oppo ची सब-ब्रँड कंपनी रिअलमीने गेल्या वर्षी हा फोन लाँच केला होता. रिअलमी सी1(2019) हा स्मार्टफोन दिसायला आधीच्या रिअलमी सी1 सारखाच असला तरी काही प्रमाणात हा वेगळा आहे. हा स्मार्टफोन 2जीबी रॅम+32जीबी स्टोरेज आणि 3जीबी रॅम+32जीबी स्टोरेज व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध आहे. 7 हजार 499 रुपये आणि 8 हजार 499 रुपये इतकी अनुक्रमे या फोनची किंमत ठेवण्यात आली आहे. जुना रिअलमी सी1 केवळ 2जीबी रॅम आणि 16जीबी स्टोरेजमध्येच उपलब्ध होता. दुपारी 12 वाजेपासून या फोनसाठी सेल सुरू झाला आहे. अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट अथवा डेबिट कार्डने खरेदी केल्यास ग्राहकांना 600 रुपयांची सवलत मिळेल.

फीचर्स –
रिअल मी सी १ या स्मार्ट फोनला ६.२ इंच इतका सुपर लार्ज डिस्प्ले आहे. इयरफोन लावण्यासाठी या स्मार्टफोनमध्ये खास सुविधा आहे. फ्रंट कॅमेराला लाइट सेन्सॉरही देण्यात आला आहे. रिअल मी सी १ हा फोन युजर फ्रेंडली आहे. या फोनच्या डिस्प्लेला कॉर्निंग गोरीला ग्लासही लावण्यात आली आहे. त्यामुळे हा स्मार्ट फोन स्क्रॅच फ्रेंडली आहे. या संपूर्ण फोनची रचना अशा पद्धतीने करण्यात आली आहे की या फोनला कोणतीही इजा पोहचणार नाही. समजा हा स्मार्ट फोन चुकून खाली पडलाच तरीही नुकसान होणार नाही. हा फोन इलेक्ट्रोप्लेटेड आहे त्यामुळे या फोनची बळकटी वाढण्यासच मदत झाली आहे.

बॅटरी आणि प्रोसेसर
रिअल मी सी १ या स्मार्टफोनला ४२३० mAH अशी मेगा बॅटरी आहे. हा स्मार्ट फोन कॉलिंगसाठी ४४ तास, गाणी, संगीत ऐकण्यासाठी १८ तास काम करू शकतो. तर तुम्हाला स्मार्ट फोनवर गेम खेळण्याची सवय असेल तर सलग १० तास तुम्ही या स्मार्टफोनवर गेम खेळू शकता इतकी चांगल्या क्षमतेची बॅटरी या फोनला देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये अॅप फ्रिजिंग पॉवर सेव्हर हे फिचरही देण्यात आले आहे. तसेच क्वीक अॅप फ्रिजिंग हे फिचरही देण्यात आले आहे. ज्यामुळे फोनसाठी वापरल्या जाणाऱ्या बॅटरीची मोठ्या प्रमाणावर बचत होऊ शकते.

कॅमेरा
रिअल मी सी १ या फोनमध्ये १३ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सल असे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. तर ५ एमपी फ्रंट कॅमेरा आहे ज्याला एआय ब्युटी हे खास फिचर देण्यात आले आहे. तसेच २९६ प्रकारचे रेकनाइजेशन पॉइंटही देण्यात आले आहेत. ज्याद्वारे वय, स्कीन टोन, स्कीन टाइप हे देखील समजण्यास मदत होऊ शकते.

इतर वैशिष्ट्ये
रिअल मी सी १ हा एक परवडणाऱ्या दरात मिळणारा स्मार्ट फोन आहे. या स्मार्ट फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ४५० हा प्रोसेसर आहे. या प्रोसेसरमुळे तुम्ही या फोनवर PUBG आणि Free Fire सारखे हेवी गेम्स अगदी आरामात खेळू शकता. या फोनला मेमरी कार्ड स्लॉटही देण्यात आला आहे. तसेच हा स्मार्ट फोन ड्युएल सीम सपोर्ट करतो. रिअल मी सी १ स्मार्ट फोन VoLTE सपोर्ट करणारा आहे. तसेच या स्मार्टफोनला फेस लॉक अनलॉकचीही सुविधा देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 12:57 pm

Web Title: realme c1 2019 to go on sale in india
Next Stories
1 व्होडाफोनची स्वस्तात मस्त ऑफर, ११९ रुपयांत…
2 सावधान..! लठ्ठपणामुळे १३ प्रकारच्या कर्करोगाचा धोका
3 स्मार्टफोननंतर आता शाओमीचे ‘स्मार्ट बूट’
Just Now!
X