News Flash

रिअलमीने भारतात आणला नवीन ‘स्वस्त’ स्मार्टफोन, Realme C11 झाला लाँच

Realme C11 स्मार्टफोन भारतात लाँच

रिअलमी कंपनीचा Realme C11 स्मार्टफोन अखेर मंगळवारी भारतात लाँच करण्यात आला आहे. कंपनीचा हा लेटेस्ट स्मार्टफोन गेल्या महिन्यात मलेशियामध्ये लाँच करण्यात आला होता. या फोनचं वैशिष्ट्य म्हणजे यात मीडियाटेक हीलियो जी35 प्रोसेसर आणि 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरी दिली आहे. शानदार फोटोग्राफीसाठी कॅमेऱ्यामध्ये AI फीचरही दिले आहे. याशिवाय कंपनीने नवीन पॉवरबँकही लाँच केली.

Realme C11 फीचर्स : 
रियलमी सी11 मध्ये 6.5 इंच एचडी+ (720×1600 पिक्सल) मिनीड्रॉप डिस्प्ले आहे. प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3+ असून 2.3 गीगाहर्ट्ज़ ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो जी35 प्रोसेसर दिले आहे. 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असलेल्या या फोनला मेमरी कार्डचाही सपोर्ट आहे. अँड्रॉइड 10 बेस्ड रिअलमी यूआयवर आधारित हा फोन ड्युअल-सिम कार्डला सपोर्ट करतो. या फोनच्या मागील बाजूला ड्युअल कॅमेरा सेटअप असून 13 मेगापिक्सलचा प्रायमरी तर, 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आहे. याशिवाय सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही आहे. कॅमेऱ्यात AI ब्यूटी, फिल्टर मोड, एचडीआर, पोर्ट्रेट मोड आणि टाइमलॅप्स यांसारखे अनेक फीचर्स आहेत. तसेच, फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4जी एलटीई, वाय-फाय 802.11 बी/जी/एन, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ए-जीपीएस, माइक्रो-यूएसबी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक यांसारखे पर्याय आहेत.

Realme C11 किंमत : 
रिअलमी सी11 या नवीन फोनची किंमत 7,499 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. हा फोन रिच ग्रीन व रिच ग्रे अशा दोन कलरमध्ये उपलब्ध असेल. तर, 22 जुलैपासून फ्लिपकार्टवरुन फोन खरेदी करता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 2:18 pm

Web Title: realme c11 launched in india with mediatek g35 soc and 5000 mah battery check price specifications and other details sas 89
Next Stories
1 वाहनप्रेमींची उत्सुकता शिगेला नेणाऱ्या ‘टेस्ला’ कार भारतात कधी येणार? इलॉन मस्क म्हणतात…
2 Realme चा ‘बजेट’ स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी, एकूण पाच कॅमेऱ्यांसह 5000mAh ची दमदार बॅटरी
3 48MP कॅमेऱ्यासह 5,000mAh ची दमदार बॅटरी, Redmi Note 9 Pro खरेदी करण्याची पुन्हा संधी
Just Now!
X