News Flash

स्वस्त Realme C11 खरेदी करण्याची आज संधी, कमी किंमतीत शानदार फीचर्स

शानदार फोटोग्राफीसाठी कॅमेऱ्यामध्ये AI फीचरही

रिअलमी कंपनीचा Realme C11 हा बजेट स्मार्टफोन खरेदी करण्याची आज (दि.22) संधी आहे. हा फोन फ्लॅश सेलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. फ्लिपकार्ट आणि रिअलमीच्या अधिकृत वेबसाइटवर दुपारी 12 वाजेपासून सेलला सुरूवात होईल. सेलमध्ये फोनच्या खरेदीवर ग्राहकांसाठी काही आकर्षक ऑफरही आहेत. ऑफरनुसार, ‘अ‍ॅक्सिस बॅक बझ क्रेडिट कार्ड’द्वारे फोन खरेदी करणाऱ्यांना 10 टक्के सवलत मिळेल. तर, ‘फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड’द्वारे फोन खरेदी करणाऱ्यांना पाच टक्के कॅशबॅकची ऑफर आहे. याशिवाय नऊ महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट इएमआयचा पर्याय देखील ग्राहकांसाठी आहे.

Realme C11 फीचर्स : 
कंपनीचा हा लेटेस्ट स्मार्टफोन गेल्या महिन्यात मलेशियामध्ये लाँच करण्यात आला होता. या फोनचं वैशिष्ट्य म्हणजे यात मीडियाटेक हीलियो जी35 प्रोसेसर आणि 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरी दिली आहे. शानदार फोटोग्राफीसाठी कॅमेऱ्यामध्ये AI फीचरही दिले आहे.  रियलमी सी11 मध्ये 6.5 इंच एचडी+ (720×1600 पिक्सल) मिनीड्रॉप डिस्प्ले आहे. प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3+ असून 2.3 गीगाहर्ट्ज़ ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो जी35 प्रोसेसर दिले आहे. 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असलेल्या या फोनला मेमरी कार्डचाही सपोर्ट आहे. अँड्रॉइड 10 बेस्ड रिअलमी यूआयवर आधारित हा फोन ड्युअल-सिम कार्डला सपोर्ट करतो. या फोनच्या मागील बाजूला ड्युअल कॅमेरा सेटअप असून 13 मेगापिक्सलचा प्रायमरी तर, 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आहे. याशिवाय सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही आहे. कॅमेऱ्यात AI ब्यूटी, फिल्टर मोड, एचडीआर, पोर्ट्रेट मोड आणि टाइमलॅप्स यांसारखे अनेक फीचर्स आहेत. तसेच, फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4जी एलटीई, वाय-फाय 802.11 बी/जी/एन, ब्लूटूथ 5.0, जीपीएस/ए-जीपीएस, माइक्रो-यूएसबी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक यांसारखे पर्याय आहेत.

Realme C11 किंमत : 
रिअलमी सी11 या नवीन फोनची किंमत 7,499 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. हा फोन रिच ग्रीन व रिच ग्रे अशा दोन कलरमध्ये उपलब्ध असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 9:48 am

Web Title: realme c11 to go on sale in india check price specifications offers sas 89
Next Stories
1 आता फाइल शेअरिंगसाठी App ची गरज नाही, गुगलचं नवीन Nearby Share फीचर
2 Amazon Prime Day Sale : सॅमसंगपासून अ‍ॅपलपर्यंत, अनेक स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट
3 पावसाळ्यातील संसर्गजन्य आजार ठेवा दूर; अशी घ्या काळजी
Just Now!
X