Realme कंपनीच्या तब्बल 108MP कॅमेरा क्षमता असलेल्या नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोनची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कंपनीचा हा लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन 24 मार्च रोजी भारतात लाँच होणार आहे. रिअलमी इंडियाचे प्रमुख माधव सेठ यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करुन 24 मार्च रोजीच्या इव्हेंटबाबत माहिती दिली आहे. पण, इव्हेंटमध्ये नेमके कोणते प्रोडक्ट्स लाँच होतील याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.

24 मार्च रोजी कंपनी Realme 8 सीरिज लाँच करण्याची शक्यता आहे. 24 मार्च रोजी Realme 8 सीरिजमध्ये दोन फोन लाँच होऊ शकतात. Realme 8 आणि Realme 8 Pro हे दोन स्मार्टफोन लाँच होण्याची शक्यता असून दोन्ही स्मार्टफोनमध्ये रिअर पॅनलवर क्वॉड कॅमेरा सेटअप मिळेल. यातील Realme 8 मध्ये 64MP क्षमतेच्या मुख्य कॅमेऱ्यासह क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप असू शकतो, तर Realme 8 Pro च्या मागील बाजूला 108MP क्षमतेचा Samsung ISOCELL HM2 sensor कॅमेरा मिळेल, असं समजतंय.



Realme 8 सीरिजच्या स्मार्टफोनमध्ये Helio G95 चिपसेटसोबत 6.4 इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले असू शकतो. शिवाय यात 30W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 5,000mAh ची दमदार बॅटरीही मिळेल. Realme 8 Pro व्हर्जनमध्ये हा फोन 6GB रॅम + 128GB आणि 8GB रॅम + 128GB इंटर्नल स्टोरेज अशा दोन पर्यायांत उपलब्ध असू शकतो. तसेच फोनमध्ये Realme UI 2.0 बेस्ड अँड्राइड 11 चा सपोर्ट असण्याची शक्यता आहे.