15 August 2020

News Flash

स्वस्तात खरेदी करा Realme चा 64MP, पाच कॅमेऱ्यांचा फोन; ऑफर उद्यापर्यंतच

ऑफर उद्यापर्यंतच

Realme कंपनीकडून फ्लिपकार्टच्या संकेतस्थळावर 10 फेब्रुवारीपासून Realme Days Sale 2020 हा सेल सुरु झालाय. 13 फेब्रुवारीपर्यंत हा सेल सुरू असेल. या सेलमध्ये Realme च्या अनेक स्मार्टफोनवर आकर्षक ऑफर्स आहेत, याशिवाय Realme 5 Pro, Realme X2 Pro आणि Realme C2 यांसारखे अनेक स्मार्टफोन कमी किंमतीत उपलब्ध आहेत. कंपनीचे अधिकृत संकेतस्थळ Realme.com वरही हा सेल सुरू आहे.

जाणून घेऊया सेलमध्ये कोणत्या फोनवर काय आहेत ऑफर्स –
या सेलमध्ये काही निवडक मोबाइलवर नो कोस्ट EMI च्या पर्यायासह MobiKwik वर 10 टक्के म्हणजे 1,000 रुपये सुपरकॅशची ऑफर आहे. तसेच, फ्लिपकार्टवर ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळेल. तर, Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवर 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅकची ऑफरही आहे.

 आणखी वाचा – (Vodafone ची भन्नाट ऑफर, रिचार्जवर मिळवा ₹2500 कॅशबॅक)

आणखी वाचा (पैसा वसूल ठरणारे आठ ‘बेस्ट’ स्मार्टफोन, किंमत १५ हजारांहून कमी)  

Realme XT-
Realme XT हा स्मार्टफोन 15 हजार 999 रुपयांऐवजी 14 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. याशिवाय ग्राहकांना mobikwik कडून 1,000 रुपये सुपरकॅश मिळेल. या फोनमध्ये 6.4 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले असून गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनसोबत 3D ग्लास आहे. फोनच्या मागील बाजूला चार कॅमेऱ्याचा सेटअप आहे. त्यातील मुख्य कॅमेरा 64 मेगापिक्सेलचा तर अन्य तीन कॅमेरे अनुक्रमे 8, 2 आणि 2 मेगापिक्सलचे आहेत. याशिवाय फोनमध्ये सेल्फीसाठी 16 मेगापिक्सल SonY iMX 471 सेंसर कॅमेरा आहे. फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या या फोनमध्ये 4000mAh ची दमदार बॅटरीही आहे.

Realme 5 Pro –
या सेलमध्ये Realme 5 Pro हा फोन 3,000 रुपयांच्या सवलतीसह उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन (4जीबी रॅम ) तुम्ही 11 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करु शकतात. तर, 6जीबी रॅम व्हेरिअंट 12,999 रुपयांमध्ये आणि 8जीबी रॅम व्हेरिअंट 14,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

रिअलमी C2 वर ₹2,000 डिस्काउंट –
सेलमध्ये हा फोन (2GB रॅम) 5 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तर, 3GB रॅम व्हेरिअंट तुम्ही 6,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकतात. या फोनमध्ये 4000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

रिअलमी X2 प्रो वर ₹2,000 डिस्काउंट-
रिअलमी X2 प्रो (6GB रॅम) व्हेरिअंट या सेलमध्ये 27 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तर, 8GB रॅम व्हेरिअंट 29,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2020 2:01 pm

Web Title: realme days sale 2020 offers and discount on smart phones know all details sas 89
Next Stories
1 दररोज 10GB 4G डेटा, BSNL ने आणले दोन दमदार प्लॅन
2 Oppo च्या शानदार फोन्सवर सात हजाराची सवलत, 13 फेब्रुवारीपर्यंत ऑफर
3 Xiaomi ने लाँच केला स्वस्त फोन, मिळेल ‘ढासू’ कॅमेरा आणि 5000 mAh ची दमदार बॅटरी
Just Now!
X