ई-कॉमर्स संकेतस्थळ फ्लिपकार्टवर Realme Days Sale सुरू झालाय. 19 ऑगस्टपासून सुरू झालेला हा सेल 22 ऑगस्टपर्यंत सुरू असेन. या सेलमध्ये Realme च्या अनेक स्मार्टफोनवर आकर्षक ऑफर्स आहेत. याशिवाय अॅक्सिस बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 10 टक्के इस्टंट डिस्काउंट मिळेल, तसंच ‘नो कॉस्ट इएमआय’चा पर्याय देखील आहे. जाणून घेऊया कोणत्या स्मार्टफोनवर किती डिस्काउंट –

रिअलमी 3 प्रो –
कंपनीच्या या लोकप्रिय स्मार्टफोनवर 18 टक्के डिस्काउंटची ऑफर आहे. सेलमध्ये हा फोन 12 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. ही किंमत 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिअंटची आहे. तर, 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंटचा फोन 15 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या स्मार्टफोनच्या खरेदीवर 12 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील आहे.

रिअलमी 2 प्रो –
सेलमध्ये या स्मार्टफोनवर 25 टक्के डिस्काउंट मिळतंय. यातील 4GB रॅम + 64GB स्टोरेज व्हेरिअंट 10 हजार 490 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तर, 6GB रॅम + 64GB स्टोरेज व्हेरिअंट 12 हजार 490 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

रिअलमी X –
पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला हा स्मार्टफोन 4GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिअंट 16 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. 8GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिअंट असलेला फोन 19 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

रिअलमी C2 –
कंपनीचा हा एंट्री लेव्हलचा स्मार्टफोन 5 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. फोनमध्ये 2GB रॅम आणि 16GB इंटरनल स्टोरेज मेमरी आहे. तर, 2GB रॅम + 32GB स्टोरेज व्हेरिअंट 6 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. जर तुम्ही 3GB + 32GB व्हेरिअंट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला 7 हजार 999 रुपये द्यावे लागतील.

रिअलमी 3i –
दुपारी 12 वाजता या फोनचा सेल आहे. यातील 3GB RAM + 32GB व्हेरिअंट 7,999 रुपयांमध्ये मिळेल. तर, 4GB RAM + 64GB व्हेरिअंट 9 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.