21 January 2021

News Flash

11,999 रुपयांत जबरदस्त फीचर्सचा स्मार्टफोन, 48MP क्वॉड कॅमेरा सेटअप + 5000mAh बॅटरी; आज सेल

सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी AI सपोर्टसह 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही

Realme चा Narzo 10 हा स्मार्टफोन आज(दि.8) पुन्हा एकदा सेलमध्ये खरेदी करण्याची संधी आहे. ग्रीन, ब्लू आणि व्हाइट अशा तीन कलरमध्ये Realme Narzo 10 खरेदी करता येईल.  दुपारी 12 वाजेपासून हा फोन फ्लिपकार्ट आणि रिअलमीच्या वेबसाइटवर सेलमध्ये उपलब्ध झाला आहे. या सेलमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने फोनच्या खरेदीवर काही शानदार ऑफरही ठेवल्या आहेत. एकूण पाच कॅमेरे असलेल्या या फोनमध्ये  6.5 इंचाचा HD+ डिस्प्ले असून वॉटरड्रॉप स्टाइल नॉच आहे. याशिवाय 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरीही या फोनमध्ये आहे.

ऑफर :-
सेलमध्ये ‘अ‍ॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्ड’द्वारे हा फोन खरेदी केल्यास 10 टक्के डिस्काउंट मिळेल. तर, ‘फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड’द्वारे हा फोन खरेदी केल्यास 5 टक्के कॅशबॅकची ऑफर आहे. याशिवाय दरमहा 1,334/ रुपये  नो कॉस्ट ईएमआय आणि स्टँडर्ड ईएमआयचा पर्यायही ग्राहकांसाठी आहे.

Realme Narzo 10 स्पेसिफिकेशन्स आणि किंमत:-
Realme Narzo 10 मध्ये 6.5 इंचाचा HD+ डिस्प्ले असून स्मार्टफोनमध्ये वॉटरड्रॉप स्टाइल नॉच आहे. MediaTek Helio G80 चिपसेटचा यामध्ये वापर करण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅमसोबत 128 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. डोळ्यांची विशेष काळजी घेण्यासाठी यामध्ये आय-केअर मोड आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. यातील 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. तर अन्य तीन कॅमेरे अनुक्रमे 8 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सलचे आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात AI सपोर्टसह 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. सुपर नाइटस्केप मोडचाही पर्याय यामध्ये युजर्सना मिळेल. याशिवाय फोनमध्ये फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरी मिळेल. 11 हजार 999 रुपये इतकी Narzo 10 या स्मार्टफोनची किंमत कंपनीने ठेवली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 12:29 pm

Web Title: realme narzo 10 once again goes on sale via flipkart check price offers and specifications sas 89
Next Stories
1 PUBG लवकरच भारतात परतणार? कोरियाच्या कंपनीने चीनच्या ‘टेन्सेंट’कडून पुन्हा घेतला गेमचा ताबा
2 6GB रॅममध्ये सर्वात स्वस्त स्मार्टफोन? Poco M2 आज भारतात होणार लाँच
3 संसर्गजन्य आहे का?, तो कसा होतो?; डेंग्यूसंदर्भात वारंवार विचारले जाणार नऊ प्रश्न आणि त्यांची उत्तरे
Just Now!
X