Realme चा लेटेस्ट स्मार्टफोन Narzo 10 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, आज (दि.30) पुन्हा एकदा हा फोन सेलमध्ये उपलब्ध असणार आहे. Realme कंपनीने गेल्या महिन्यात भारतामध्ये आपल्या नवीन Narzo सीरिजचे Narzo 10 आणि Narzo 10A हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले. यातील Narzo 10 हा स्मार्टफोन आज पुन्हा एकदा भारतात सेलमध्ये उपलब्ध असणार आहे.

ऑफर :-
दुपारी 12 वाजेपासून फ्लिपकार्ट आणि रिअलमीच्या अधिकृत वेबसाइटवर सेलला सुरूवात होईल. सेलमध्ये हा फोन ‘फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड’द्वारे खरेदी केल्यास 5 टक्के कॅशबॅक आणि ‘अॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्ड’द्वारे खरेदी करणाऱ्यांना एक्स्ट्रा 5 टक्के डिस्काउंटची ऑफर आहे. तसेच, फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 3 ते 12 महिन्यांच्या नो-कॉस्ट ईएमआईचा पर्यायही मिळेल.

Realme Narzo 10 स्पेसिफिकेशन्स आणि किंमत:-
Realme Narzo 10 ग्रीन, ब्लू आणि व्हाइट अशा तीन कलरमध्ये खरेदी करता येईल. Realme Narzo 10 मध्ये 6.5 इंचाचा HD+ डिस्प्ले असून स्मार्टफोनमध्ये वॉटरड्रॉप स्टाइल नॉच आहे. MediaTek Helio G80 चिपसेटचा यामध्ये वापर करण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅमसोबत 128 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. डोळ्यांची विशेष काळजी घेण्यासाठी यामध्ये आय-केअर मोड आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप मिळतो. यातील 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. तर अन्य तीन कॅमेरे अनुक्रमे 8 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सलचे आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात AI सपोर्टसह 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. सुपर नाइटस्केप मोडचाही पर्याय यामध्ये युजर्सना मिळेल. याशिवाय फोनमध्ये फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरी मिळेल. 11 हजार 999 रुपये इतकी Narzo 10 या स्मार्टफोनची किंमत कंपनीने ठेवली आहे.