News Flash

‘स्वस्त’ Realme स्मार्टफोनचा सेल, कॅशबॅकसह मिळेल इस्टंट डिस्काउंटचीही ऑफर

किंमत १० हजारांपेक्षाही कमी...

Realme कंपनीच्या लेटेस्ट Narzo सीरिजमधील Narzo 10A हा स्मार्टफोन आज(दि.3) ‘फ्लॅश सेल’मध्ये उपलब्ध असणार आहे. या  स्मार्टफोनद्वारे परवडणाऱ्या किंमतीमध्ये दमदार फीचर्स देण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे. फिल्पकार्ट आणि Realme.com वर हा फोन दुपारी 12 वाजेपासून सेलमध्ये उपलब्ध असेल. सेलमध्ये फोनच्या खरेदीवर काही आकर्षक ऑफरही आहेत. यामध्ये ‘फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड’द्वारे हा फोन खरेदी केल्यास 5 टक्के कॅशबॅक मिळेल. तर, ‘अ‍ॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्ड’वर 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळेल. याशिवाय नो-कॉस्ट इएमआयचा पर्यायही आहे. तसेच, रिअलमीच्या वेबसाइटवर या फोनसाठी एक्सचेंज ऑफरही आहे.

Realme Narzo 10A ची किंमत :- 
Realme Narzo 10A हा स्मार्टफोन आधी एखाच व्हेरिअंटमध्ये उपलब्ध होता. पण आता हा फोनही दोन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध झाला आहे. या फोनच्या 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 8,499 रुपये तर, 4GB + 64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 9,999 रुपये आहे. Realme Narzo 10A स्मार्टफोन ब्लू आणि व्हाइट अशा दोन कलरमध्ये उपलब्ध असेल.

Realme Narzo 10A स्पेसिफिकेशन्स:-
रिअलमी Narzo 10A मध्ये 6.5 इंचाचा HD+ डिस्प्ले आणि MediaTek Helio G70 चिपसेट आहे. या फोनच्या रिअर पॅनलवर फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. मिनी-ड्रॉप फुलस्क्रीन असलेल्या या फोनमध्ये हाय ग्राफिक PUBG खेळता येईल. स्टोरेज वाढवण्यासाठी फोनला मेमरी कार्डचा सपोर्टही आहे. तर, 5000mAh क्षमतेच्या दमदार बॅटरीमुळे 43 तासांपेक्षा अधिक टॉकटाइम मिळेल असा कंपनीचा दावा आहे. ट्रिपल कॅमेरा सेटअप असलेल्या या फोनचा मुख्य कॅमेरा 12 मेगापिक्सलचा तर अन्य दोन कॅमेरे अनुक्रमे 2 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सल क्षमतेचे आहेत. कॅमेऱ्यात अल्ट्रा मॅक्रो, पोर्टेट मोड आणि एचडीआर मोडशिवाय 4x झूम हे फीचर्स मिळतील. सेल्फीसाठी या फोनमध्ये AI सपोर्टसह 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2020 11:21 am

Web Title: realme narzo 10a sale get price specifications and all details sas 89
Next Stories
1 गुरुपौर्णिमेलाच चंद्रगहणाचा योग; पाहा कधी, कुठून आणि कसे पाहता येणार
2 जिओने लाँच केलं JioMeet, एकाचवेळी 100 जणांना ‘फ्री’मध्ये करता येणार व्हिडिओ कॉल
3 आयव्हीएफ उपचारांकडे लॉकडाउनमुळे करू नका दुर्लक्ष; या गोष्टींची ‘घ्या’ काळजी
Just Now!
X