Realme कंपनीने गेल्या महिन्यात भारतामध्ये आपल्या लेटेस्ट Narzo सीरिजचे Narzo 10 आणि Narzo 10A हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले. कंपनीने हे दोन्ही स्मार्टफोन मिडरेंज आणि बजेट सेगमेंटमध्ये आणले आहेत. या दोन स्मार्टफोनद्वारे परवडणाऱ्या किंमतीमध्ये दमदार फीचर्स देण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे. यातील Narzo 10A या स्मार्टफोनच्या विक्रीसाठी फिल्पकार्ट आणि Realme.com वर आज (दि.19) खास सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. हा फोन दुपारी 12 वाजेपासून सेलमध्ये उपलब्ध असेल.

सेलमध्ये Narzo 10A फोनच्या खरेदीवर काही आकर्षक ऑफरही आहेत. यामध्ये ग्राहकांना ‘फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड’द्वारे 5 टक्के कॅशबॅकची ऑफर मिळेल. याशिवाय ‘अ‍ॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्ड’वरही 5 टक्के डिस्काउंट ग्राहकांना मिळेल. नो-कॉस्ट इएमआयचा पर्यायही ग्राहकांसाठी ठेवण्यात आला आहे. रिअलमीच्या बेवसाइटवरुन Mobikwik या अ‍ॅपद्वारे हा फोन खरेदी केल्यास 500 रुपये कॅशबॅकची ऑफर आहे. तर, फ्लिपकार्टवरुन RuPay डेबिट कार्डद्वारे पहिल्यांदाच ट्रांझेक्शन करुन हा फोन खरेदी करणाऱ्यांना 30 रुपये डिस्काउंट मिळेल.

Realme Narzo 10A स्पेसिफिकेशन्स:-
रिअलमी Narzo 10A मध्ये 6.5 इंचाचा HD+ डिस्प्ले आणि MediaTek Helio G70 चिपसेट आहे. या फोनच्या रिअर पॅनलवर फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. मिनी-ड्रॉप फुलस्क्रीन असलेल्या या फोनमध्ये हाय ग्राफिक PUBG खेळता येईल. स्टोरेज वाढवण्यासाठी फोनला मेमरी कार्डचा सपोर्टही आहे. तर, 5000mAh क्षमतेच्या दमदार बॅटरीमुळे 43 तासांपेक्षा अधिक टॉकटाइम मिळेल असा कंपनीचा दावा आहे. ट्रिपल कॅमेरा सेटअप असलेल्या या फोनचा मुख्य कॅमेरा 12 मेगापिक्सलचा तर अन्य दोन कॅमेरे अनुक्रमे 2 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सल क्षमतेचे आहेत. कॅमेऱ्यात अल्ट्रा मॅक्रो, पोर्टेट मोड आणि एचडीआर मोडशिवाय 4x झूम हे फीचर्स मिळतील. सेल्फीसाठी या फोनमध्ये AI सपोर्टसह 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.