रिअलमी कंपनीने फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात भारतीय बाजारात आपला स्वस्त 5G स्मार्टफोन Realme Narzo 30 Pro 5G  लाँच केला होता. हा दमदार फोन आज(दि.४) पहिल्यांदाच भारतात खरेदी करण्याची संधी आहे. कारण दुपारी 12 वाजेपासून फ्लिपकार्ट आणि रिअलमीच्या वेबसाइटवर Realme Narzo 30 Pro 5G साठी पहिल्या फ्लॅश सेलला सुरूवात होणार आहे. हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केलाय. Realme Narzo 30 Pro 5G हा फोन भारतात मीडियाटेक Dimensity 800U प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे.

Realme Narzo 30 Pro 5G स्पेसिफिकेशन्स :-
Realme Narzo 30 Pro 5G अँड्रॉइड 10 वर आधारित Realme UI चा सपोर्ट असून 6.5 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. फोनमध्ये मीडियाटेक Dimensity 800U 5डी प्रोसेसर, 8 जीबीपर्यंत LPDDR4X रॅम आणि 128 जीबीपर्यंत स्टोरेज आहे. याशिवाय फोनच्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यातील 48 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, दुसरा 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि तिसरा 2 मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा सेन्सर आहे. तसेच सेल्फीसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळेल. फोनमध्ये तीन कार्ड स्लॉट असून यात 5G, 4G LTE, Wi-Fi 802.11 ac, ब्लूटूथ v5.1, GPS/A-GPS आणि टाइप सी पोर्ट आहेत. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरही आहे. तसेच, 30W डर्ट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 5000mAh ची बॅटरीही मिळेल.

Realme Narzo 30 Pro 5G, Realme Narzo 30A ची किंमत :-
Realme Narzo 30 Pro 5G च्या 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 16 हजार 999 रुपये आणि 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 19 हजार 999 रुपये आहे. हा फोन स्वॉर्ड ब्लॅक आणि ब्लेड सिल्वर अशा दोन रंगांच्या पर्यायात उपलब्ध असेल.