Realme कंपनीने गेल्या महिन्यात भारतात आपली Realme Narzo 30 सीरिज लाँच केली होती. या सीरिजअंतर्गत कंपनीने Narzo 30 Pro 5G आणि Narzo 30A हे फोन लाँच केले. यातील Narzo 30 Pro 5G स्मार्टफोनची विक्री देशात सुरू झाली आहे, तर आज(दि.5) पहिल्यांदाच Narzo 30A हा बजेट स्मार्टफोन सेलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. या फोनमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर आणि तब्बल 6,000mAh क्षमतेची दमदार बॅटरी आहे.

आकर्षक ऑफर्स :-
फ्लिपकार्ट आणि रिअलमीच्या अधिकृत वेबसाइटवर या फोनसाठी दुपारी 12 वाजेपासून सेलला सुरूवात होईल. फ्लिपकार्टवरील सेलमध्ये फोनच्या खरेदीवर काही आकर्षक ऑफर्सचा फायदाही मिळू शकतो. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये या फोनवर ग्राहकांना अ‍ॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डवर 500 रुपये इंस्टंट डिस्काउंट मिळेल. तसेच फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅकचीही ऑफर मिळेल. याशिवाय पंधराशे रुपये दरमहा नो-कॉस्ट ईएमआयचा पर्यायही आहे.

Realme Narzo 30A स्पेसिफिकेशन्स :-
Realme Narzo 30A मध्ये अँड्रॉइड 10 वर आधारित Realme UI आहे. याशिवाय 6.5 इंचाचा HD+ डिस्प्ले असून वॉटरड्रॉप नॉच आहे. मीडियाटेक हीलियो G85 प्रोसेसरचा सपोर्ट असलेल्या या फोनमध्ये 4 जीबीपर्यंत रॅम आणि 64 जीबीपर्यंत स्टोरेज मिळेल. तर, फोनच्या मागील बाजूला ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यातील मुख्य कॅमेरा 13 मेगापिक्सेलचा तर दुसरा मोनोक्रोम लेन्स सेन्सर आहे. याशिवाय सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये 4G LTE, Wi-Fi 802.11ac, ब्लूटूथ v5.0, GPS/A-GPS आणि टाइप सी पोर्ट आहेत. यातही रिअर माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. Realme Narzo 30A मध्ये कंपनीने 18W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 6000 mAh क्षमतेची दमदार बॅटरी दिली आहे.

 Realme Narzo 30A ची किंमत :-
Realme Narzo 30A च्या 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेजची किंमत 8 हजार 999 रुपये आणि 4 जीबी रॅम व 64 जीबी व्हेरिअंटची किंमत 9 हजार 999 रुपये आहे. हा फोन लेजर ब्लॅक आणि लेजर ब्लू अशा दोन रंगात खरेदी करता येईल.