Realme कंपनीने भारतामध्ये आपल्या नवीन Narzo सीरिजचे Narzo 10 आणि Narzo 10A हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. या दोन स्मार्टफोनद्वारे परवडणाऱ्या किंमतीमध्ये दमदार फीचर्स देण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन मिडरेंज आणि बजेट सेगमेंटमध्ये उपलब्ध आहेत.

Realme Narzo 10 आणि Narzo 10A ची किंमत :- 
Realme Narzo 10A हा स्मार्टफोन कंपनीने एकाच व्हेरिअंटमध्ये लॉन्च केला आहे. याच्या 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 8,499 रुपये आहे. Realme Narzo 10A स्मार्टफोन ब्लू आणि व्हाइट अशा दोन कलरमध्ये उपलब्ध असेल. तर, Realme Narzo 10 ग्रीन आणि व्हाइट अशा दोन कलरमध्ये खरेदी करता येईल. तर, Realme Narzo 10 हा स्मार्टफोन कंपनीने 11,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅमसोबत 128 जीबी इंटर्नल स्टोरेज आहे.

Realme Narzo 10 स्पेसिफिकेशन्स:-
नवीन Realme Narzo 10 मध्ये 6.5 इंचाचा HD+ डिस्प्ले असून स्मार्टफोनमध्ये वॉटरड्रॉप स्टाइल नॉच आहे. MediaTek Helio G80 चिपसेटचा यामध्ये वापर करण्यात आला आहे. रॅमसाठी 3 जीबी आणि 4 जीबी असे दोन पर्याय आहेत. फोनमध्ये 128 जीबी इंटर्नल स्टोरेजही आहे. डोळ्यांची विशेष काळजी घेण्यासाठी यामध्ये आय-केअर मोड आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप मिळतो. यातील 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. तर अन्य तीन कॅमेरे अनुक्रमे 8 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सलचे आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात AI सपोर्टसह 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. सुपर नाइटस्केप मोडचाही पर्याय यामध्ये युजर्सना मिळेल. याशिवाय फोनमध्ये फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरी मिळेल.

Realme Narzo 10A स्पेसिफिकेशन्स:-
रिअलमी Narzo 10A मध्ये 6.5 इंचाचा HD+ डिस्प्ले आणि MediaTek Helio G70 चिपसेट आहे. या फोनच्या रिअर पॅनलवर फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. मिनी-ड्रॉप फुलस्क्रीन असलेल्या या फोनमध्ये हाय ग्राफिक PUBG खेळता येईल. स्टोरेज वाढवण्यासाठी फोनला मेमरी कार्डचा सपोर्टही आहे. तर, 5000mAh क्षमतेच्या दमदार बॅटरीमुळे 43 तासांपेक्षा अधिक टॉकटाइम मिळेल असा कंपनीचा दावा आहे. ट्रिपल कॅमेरा सेटअप असलेल्या या फोनचा मुख्य कॅमेरा 12 मेगापिक्सलचा तर अन्य दोन कॅमेरे अनुक्रमे 2 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सल क्षमतेचे आहेत. कॅमेऱ्यात अल्ट्रा मॅक्रो, पोर्टेट मोड आणि एचडीआर मोडशिवाय 4x झूम हे फीचर्स मिळतील. सेल्फीसाठी या फोनमध्ये AI सपोर्टसह 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.