14 August 2020

News Flash

रिअलमीच्या नवीन फोनमध्ये होते Ban झालेले चिनी अ‍ॅप्स, कंपनीचे सीईओ म्हणतात…

सोशल मीडियावर युजर्सनी उपस्थित केले होते प्रश्न

भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये आपली वेगळी जागा निर्माण करण्यासाठी रिअलमी कंपनीने यावर्षी अनेक नवीन बजेट आणि मिडरेंज फोन लाँच केले. पण, कंपनीने नुकत्याच लाँच केलेल्या Realme C11 मध्ये अनेक चिनी अ‍ॅप्स प्री-इंस्टॉल्ड असल्याचं समोर आलं. या चिनी अ‍ॅप्सना भारतात बॅन करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर ही बाब समोर आल्यानंतर एका सॉफ्टवेअर अपडेटद्वारे हे अ‍ॅप्स फोनमधून हटवले जातील असं आता कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

रिअलमी कंपनीचे सीईओ माधव सेठ यांनी, “आमच्या नवीन Realme 6i आणि अन्य रिअलमी स्मार्टफोन्समध्ये कोणतंही बंदी घातलेलं अ‍ॅप मिळणार नाही. ज्या स्मार्टफोन्समध्ये बंदी घातलेले चिनी अ‍ॅप्स आधीपासूनच इस्टॉल असतील त्या स्मार्टफोन्ससाठी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एक अपडेट जारी केलं जाईल. या अपडेटनंतर युजर्स ते अ‍ॅप्स फोनमधून डिलीट करु शकतील”, असं सांगितलं आहे.

ट्विटरद्वारे याबाबत माहिती देताना माधव सेठ यांनी रिअलमीच्या कोणत्याही फोनमध्ये यापुढे बॅन असलेलं अ‍ॅप मिळणार नाही असं स्पष्ट केलं. याशिवाय Clean up Storage या फीचरलाही OTA अपडेट्सद्वारे हटवलं जाईल. अशाप्रकरच्या अ‍ॅप्सची युजरला आवश्यकता असेल तर थर्डी पार्टी अ‍ॅपचा वपरता करता येईल, असंही त्यांनी नमूद केलं. Clean up Storage हे फीचर बॅन केलेल्या क्लिन मास्टर अ‍ॅपच्या मदतीने काम करतं. सोशल मीडियावर युजर्सनी याबाबत प्रश्न उपस्थित केले होते.


भारत सरकारने गेल्या महिन्यात 59 चिनी अ‍ॅप्स बंद केले आहेत. बॅन केलेल्या अ‍ॅप्सच्या यादीत Tiktok, WeChat आणि Helo यांसारख्या अ‍ॅप्सचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 9:55 am

Web Title: realme phones will not have any banned apps pre installed says ceo madhav seth sas 89
Next Stories
1 Airtel ची भन्नाट ऑफर, रिचार्जवर फ्री मिळेल 6GB पर्यंत डेटा
2 केसांच्या सौंदर्यापासून ते रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यापर्यंत सोयाबीन खाण्याचे १० फायदे
3 कोबी खाण्याचे ‘हे’ गुणकारी फायदे माहित आहे का?
Just Now!
X