Realme Narzo 10 हा स्मार्टफोन आणि रिअलमी स्मार्ट टीव्हीचे दोन व्हेरिअंट (-32 इंच आणि 43 इंच) आज सेलमध्ये खरेदी करण्याची संधी आहे. फ्लिपकार्ट आणि रिअलमी इंडियाच्या वेबसाइटवर दुपारी 12 वाजेपासून सेल सुरू होईल. सेलमध्ये या दोन्ही प्रोडक्ट्सवर काही शानदार ऑफरही आहेत.

Realme Narzo 10 ऑफर:-
Realme Narzo 10 स्मार्टफोन ‘फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास 10 टक्के डिस्काउंट मिळेल. तर, ‘अ‍ॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्ड’द्वारे 5 टक्के कॅशबॅकचा फायदा होईल. याशिवाय 1,334 रुपये दर महिना नो-कॉस्ट ईएमआयाचा पर्यायही आहे.

Realme Smart TV ऑफर:-
रिअलमी टीव्हीसाठीही शानदार ऑफर आहेत. एचएसबीसी क्रेडिट कार्डद्वारे शॉपिंग करणाऱ्यांना 10 टक्के इंस्टंट डिस्काउंटसोबत ‘फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड’वर 10 टक्के सूट आणि ‘अ‍ॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्ड’वर 5 टक्के कॅशबॅकचा फायदा मिळू शकतो. याशिवाय टीव्हीच्या 32 इंच व्हेरिअंटला 1445 रुपये आणि 43 इंच व्हेरिअंटला 2445 रुपये किमान ईएमआयवर खरेदी करण्याचा पर्यायही आहे.

Realme Narzo 10 स्पेसिफिकेशन्स आणि किंमत:-
Realme Narzo 10 ग्रीन, ब्लू आणि व्हाइट अशा तीन कलरमध्ये खरेदी करता येईल. Realme Narzo 10 मध्ये 6.5 इंचाचा HD+ डिस्प्ले असून स्मार्टफोनमध्ये वॉटरड्रॉप स्टाइल नॉच आहे. MediaTek Helio G80 चिपसेटचा यामध्ये वापर करण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅमसोबत 128 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. डोळ्यांची विशेष काळजी घेण्यासाठी यामध्ये आय-केअर मोड आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. यातील 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. तर अन्य तीन कॅमेरे अनुक्रमे 8 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सलचे आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात AI सपोर्टसह 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. सुपर नाइटस्केप मोडचाही पर्याय यामध्ये युजर्सना मिळेल. याशिवाय फोनमध्ये फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरी मिळेल. 11 हजार 999 रुपये इतकी Narzo 10 या स्मार्टफोनची किंमत कंपनीने ठेवली आहे.

Realme Smart TV स्पेसिफिकेशन्स आणि किंमत:-
Realme Smart TV मध्ये अनेक शानदार फीचर्स आहेत. टीव्हीच्या 32 इंच मॉडेलमध्ये 1366×768 पिक्सल म्हणजे एचडी रिझोल्युशन पॅनल आहे. तर, 43 इंचाच्या मॉडेलमध्ये 1920×1080 पिक्सल फुल एचडी डिस्प्ले आहे. 1जीबी रॅम आणि 8जीबी इंटर्नल स्टोरेज असलेल्या रिअलमी टीव्हीमध्ये मीडियाटेक MSD6683 प्रोसेसर आहे. अँड्रॉइड टीव्ही 9 पाय ओएसवर कार्यरत असून यामध्ये गुगल प्ले स्टोअरचा अ‍ॅक्सेस मिळतो. दर्जेदार पिक्चर क्वॉलिटीसाठी यामध्ये HDR10 सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच दमदार साउंडसाठी डॉल्बी ऑडियो सपोर्टसह 24 वॅटचे चार स्पीकर दिले आहेत. गुणवत्ता तपासण्यासाठी या टीव्हीच्या अनेक चाचण्या (टेस्ट) घेण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे. यामध्ये 20 डिग्री तापमान टेस्ट, 760 एमएम ड्रॉप टेस्ट, 5000 वेळा रिमोट बटण टेस्ट आणि 5500 वेळेस पॉवर ऑन-ऑफ टेस्ट, घेण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे. तर, कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ब्लूटूथ व्हर्जन 5.0, तीन HDMI पोर्ट आणि दोन युएसबी पोर्टचे पर्यायही आहेत. 32 इंच मॉडेलच्या Realme Smart TV ची किंमत 12,999 रुपये आहे. तर, 43 इंच मॉडेलची किंमत 21,999 रुपये ठेवण्यात आली आहे.