चीनची रिअलमी कंपनी लवकरच भारतात आपला पहिला स्मार्ट टीव्ही आणि त्यासोबतच पहिले स्मार्ट वॉच लाँच करणार आहे. येत्या 25  मे रोजी कंपनी भारतात आपला पहिला टीव्ही लाँच करणार आहे.

अधिकृत लाँचिंगआधी सोशल मीडियावर कंपनीने या टीव्हीच्या फीचर्सबाबतची माहिती शेअर केली आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर आणि रिअलमीच्या अधिकृत संकेतस्थळावरही या टीव्हीचे डिटेल्स उपलब्ध झालेत. फ्लिपकार्टवर या टीव्हीसाठी एक वेगळं पेज तयार करण्यात आलं आहे.

आणखी वाचा- Realme च्या ‘या’ फोनचा पहिलाच सेल…फक्त तीन मिनिटात विकले 70 हजार स्मार्टफोन

रिअलमी टीव्हीमध्ये मॉडर्न डिझाइन असलेला बेजल-लेस डिस्प्ले आहे. दर्जेदार व्हिडिओ क्वालिटीसाठी यामध्ये क्रोमा बूस्ट पिक्चर इंजिन असेल. या टीव्हीमध्ये  64-bit ARM Cortex-A53 CPU आणि Mali-470 MP3 GPU  सोबत मीडियाटेक प्रोसेसर आहे. याशिवाय, दमदार साउंडसाठी डॉल्बी ऑडियो सपोर्टसह 24 वॅटचे चार स्पीकर दिले आहेत. गुणवत्ता तपासण्यासाठी या टीव्हीच्या अनेक चाचण्या (टेस्ट) घेण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे. यामध्ये 20 डिग्री तापमान टेस्ट, 760 एमएम ड्रॉप टेस्ट, 5000 वेळा रिमोट बटण टेस्ट आणि 5500 वेळेस पॉवर ऑन-ऑफ टेस्ट, घेण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे.

आणखी वाचा- Redmi Note 9 Pro खरेदी करण्याची अजून एक संधी, जाणून घ्या ऑफर्स

हा नवीन टीव्ही अँड्रॉइड टीव्ही असेल हे कंपनीने स्पष्ट केले आहे. पण, हा टीव्ही कोणत्या साइजमध्ये लाँच केला जाईल आणि याची किंमत किती असेल याबाबत मात्र अद्याप कंपनीने माहिती दिलेली नाही. पण  एका रिपोर्टनुसार हा टीव्ही भारतात तीन व्हेरिअंटमध्ये लाँच केला जाण्याची शक्यता आहे. भारतात 32 इंच, 43 इंच आणि 55 इंच अशा तीन प्रकारांमध्ये कंपनी हा टीव्ही लाँच करु शकते. 32 इंच आणि 43 इंचाच्या टीव्हीची किंमत अनुक्रमे 10,000 रुपये आणि 19,990 रुपये असू शकते. पण 55 इंचाच्या टीव्हीची किंमत किती असेल याबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही.