चीनच्या Realme कंपनीने भारतात Realme X आणि Realme 3i हे आपले दोन नवे स्मार्टफोन लाँच केले आहेत. फ्लिपकार्ट आणि Realme.com  या संकेतस्थळावर हे फोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. 24 जुलै दुपारी 12 वाजेपासून Realme X स्मार्टफोनसाठी सेल आयोजित करण्यात आला आहे. तर, Realme 3i स्मार्टफोनसाठी 23 जुलै रोजी दुपारी 12 वाजेपासून पहिला सेल आयोजित करण्यात आला आहे.

Realme X मध्ये 6.53 इंचाचा FHD+ नॉचलेस सुपर AMOLED डिस्प्ले आहे. यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 चं सुरक्षाकवच असून पोलर व्हाइट आणि स्पेस ब्ल्यू अशा दोन रंगांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध असेल. मागील बाजूला ड्युअल कॅमेरा सेटअप असून यातील एक कॅमेरा 48 मेगापिक्सल आणि दुसरा 5 मेगापिक्सलचा आहे. कॅमेऱ्यात Sony IMX586 सेंसरचा वापर करण्यात आलाय. सेल्फीसाठी या फोनमध्ये Sony IMX471 सेंसरसह 16 मेगापिक्सलचा AI पॉप-अप सेल्फी कॅमेरा आहे. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रैगन 710AIE प्रोसेसर आहे. हा फोन पूर्ण चार्ज होण्यासाठी 78 मिनिटांचा वेळ लागतो असा कंपनीचा दावा आहे.

Realme 3i  या स्मार्टफोनमध्ये 6.22 इंचाची ड्यूड्रॉप फुल स्क्रीन आहे. डायमंड-कट डिझाइनसह असलेला हा स्मार्टफोन डायमंड ब्ल्यू, डायमंड रेड, डायमंड ब्लॅक अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल. यात 4,230 mAh क्षमतेची बॅटरी असून एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर सलग 11 तास PUBG  खेळता येणं शक्य आहे, याशिवाय 21 तास ब्राऊझरवर इंटरनेटचा वापर आणि 13 तास YouTube चा वापर करता येणार आहे. या स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असून मागील बाजूला AI ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. यातील एक कॅमेरा 13 मेगापिक्सल तर दुसरा कॅमेरा 2 मेगापिक्सलचा आहे.

Realme X फीचर्स –

डिस्प्ले : 6.53 इंच
प्रोसेसर : क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 710
फ्रंट कॅमेरा : 16-मेगापिक्सल
रियर कॅमेरा : 48-मेगापिक्सल + 5-मेगापिक्सल
रॅम : 8 जीबी
स्टोरेज : 128 जीबी
बॅटरी क्षमता : 3765 एमएएच
ओएस : अँड्रॉइड
रिझोल्यूशन :  1080

किंमत –
Realme 3i स्मार्टफोनमध्ये AI फेशियल आणि फिंगरप्रिंट अनलॉक फीचर आहे. हा स्मार्टफोन दोन रॅम व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. यातील 3GB रॅम+32GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 7 हजार 999 रुपये आहे, तर 4GB रॅम+64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 9 हजार 999 रुपये आहे.

Realme X – 4GB रॅम+128GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 16 हजार 999 रुपये, तर 8GB रॅम+128GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 19 हजार 999 रुपये आहे.