चिनी कंपनी रियलमी (Realme) आपला स्मार्टफोन Realme X2 आज भारतात लाँच करणार आहे. कंपनीने हा फोन सर्वप्रथम सप्टेंबर महिन्यात चीनमध्ये लाँच केला होता. यासोबतच कंपनी रियलमी बड्स एअर(Realme Buds Air)देखील बाजारात आणणार आहे. हे कंपनीचे पहिले वायरलेस इअरबड्स आहेत. येलो, ब्लॅक आणि व्हाइट असा तीन रंगांमध्ये बड्स उपलब्ध असतील. तर, रीयलमी एक्स 2 मध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप, स्नॅपड्रॅगन 730G प्रोसेसर आणि VOOC 4.0 फ्लॅश फास्ट चार्जिंग सपॉर्टसह 4,000mAh क्षमतेची बॅटरी यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत स्नॅपड्रॅगन 730 जी चिपसेटसह येणारा पहिला फोन असल्याचे सांगितले जात आहे.

लॉन्चिंग इव्हेंट –
रियलमीचा लॉन्चिंग इव्हेंट आज दुपारी 12:30 वाजता सुरू होईल. यामध्ये कंपनी आपले दोन्ही प्रोडक्ट लाँच करेल. कंपनीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर रिअॅलिटी एक्स 2 आणि रियलमी बड एअरचा लॉन्चिंग इव्हेंट थेट पाहू शकता.

किंमत –
Realme X2 हा स्मार्टफोन 6 जीबी रॅम व 8 जीबी रॅम अशा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असणार आहे. 128 जीबी स्टोरेज दोन्ही व्हेरिअंटमध्ये असेल. लॉन्च होण्यापूर्वी याची किंमत लीक झाली असून टिपस्टर ईशान अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, रियलमी एक्स 2 च्या 6 GB रॅम व 128GB इंटरनल स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 19,999 रुपये, तर, 8GB रॅम व 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 20,999 रुपये असू शकते. याशिवाय, भारतात रियलमी बड्स एअरची किंमत 4 हजार 999 रुपये असू शकते.

रियलमी X2 स्पेसिफिकेशन्स –
या फोनमध्ये 30W VOOC फ्लॅश चार्ज सपॉर्टसह 4,000mAh क्षमतेची बॅटरी असेल. या टेक्नॉलजीसह हा फोन 30 मिनिटात 67 टक्के चार्ज होईल. फोनमध्ये 32MP सेल्फी कॅमेरा असेल. यामध्ये 6.4 इंच FHD+ सुपर AMOLED स्क्रीनसह इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळेल. फोनच्या मागील बाजूला 4 कॅमेरे असतील, यामध्ये प्रायमरी सेंसर 64MP तर अन्य सेंसर 8MP, 2MP आणि 2MP क्षमतेचे असतील.

रियलमी बड्स एअर –
यात 12mm डायनॅमिक बेस बूस्ट (DBB)असणार आहे. यापूर्वी नेकबँड हेडफोन्समध्ये 11.2 मिमी डीडीबी ड्रायव्हर्स रियलमी बड्स वायरलेस देण्यात आले होते. हे इअर बड्स डिटेक्शन टेक्नॉलॉजीसह उपलब्ध आहे. यामुळे वापरकर्त्याने ते घातले आहे की नाही हे त्यांना समजू शकेल. या व्यतिरिक्त हे इअर बल्स टच कंट्रोल, वायरलेस चार्जिंगसह येणार आहेत. मायक्रो यूएसबी पोर्टच्या ऐवजी टाइप सी यूएसबी पोर्ट चार्जिंगसाठी देण्यात आले आहेत. हे इअर बड्स ड्युअल माइक ईएनसीसह येतील. ड्युअल माइक ENC द्वारे कॉल दरम्यान वापरकर्त्यास उत्तम ऑडिओ गुणवत्ता मिळणार आहे. येलो, ब्लॅक आणि व्हाइट असा तीन रंगांमध्ये बड्स उपलब्ध असतील.