भारताच्या पहिल्या 5G स्मार्टफोनचे अखेर आगमन झाले आहे. ‘शाओमी’ची सब-ब्रँड कंपनी रिअलमीने Realme X50 Pro 5G हा स्मार्टफोन काल(दि.24) लाँच केला. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर असलेल्या या फोनमध्ये 65W सुपरडार्ट फ्लॅश चार्ज टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. एकूण सहा कॅमेरे असलेला तीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आलाय. हा स्मार्टफोन ई-कॉमर्स संकेतस्थळ फ्लिपकार्ट आणि कंपनीचे अधिकृत संकेतस्थळ realme.com वरुन हा फोन खरेदी करता येईल.

फीचर्स – इतर फ्लॅगशिप स्मार्टफोनप्रमाणे Realme X50 Pro 5G च्या बॅकमध्ये ग्लास आहे. फोनमध्ये 6.44 इंच फुल HD+ सुपर अॅमोलेड स्क्रीन असून स्क्रीनच्या टॉपवर डाव्या बाजूला ड्युअल पंच-होल कटआउट आहे. स्मार्टफोनची स्क्रीन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्टेड असून यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर आणि 12GB पर्यंत रॅम आहे. याशिवाय फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरही आहे. Realme X50 Pro 5G स्मार्टफोनच्या मागील बाजूला क्वॉड कॅमेरा सेटअप आहे. यातील 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे, तर 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल शूटर, 12 मेगापिक्सल टेलिफोटो लेंस, 2 मेगापिक्सल पोर्ट्रेट कॅमेरा आहे. याशिवाय फोनच्या पुढील बाजूला दोन सेल्फी कॅमेरे आहेत. यात 32 मेगापिक्सलचा Sony IMX 616 प्रायमरी सेंसर आणि 8 मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच, रिअलमीच्या या स्मार्टफोनमध्ये 65W सुपर डार्ट चार्जिंगसह 4,200 mAh क्षमतेची बॅटरी आहे. तर, फोनमध्ये 5G (NSA/SA आणि मेनस्ट्रीम बँड्स), 4G VoLTE, Wi-Fi6, ब्लूटूथ v5.1 आणि USB Type-C पोर्ट यांसारखे कनेक्टिव्हिटी पर्याय आहेत.

किंमत –
37 हजार 999 रुपये इतकी या स्मार्टफोनची बेसिक किंमत ठेवण्यात आली आहे. ही किंमत 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंटची आहे. 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 39 हजार 999 रुपये आहे. तर, 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 44 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन मॉस ग्रीन आणि रस्ट रेड या दोन कलरच्या पर्ययांमध्ये मिळेल.