News Flash

2,399 रुपयांची बॅग केवळ 1 रुपयात, Realme चा धमाकेदार सेल

दरदिवशी केवळ 300 ग्राहकांसाठी ही ऑफर, स्मार्टफोन्सवरही आकर्षक सूट वाचा...

40 लाख ग्राहकांचा आकडा ओलांडल्यानंतर चीनची कंपनी Realme ने तीन दिवसांचा Realme Yo! Days सेल आयोजीत केला आहे. 7 जानेवारी म्हणजे आजपासून हा सेल सुरू झाला असून 9 जानेवारीपर्यंत हा सेल सुरू असणार आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सुरू झालेल्या या तीन दिवसांच्या सेलमध्ये ग्राहकांसाठी अनेक ऑफर्स देण्यात आल्या आहेत.

या सेलमध्ये पहिल्यांदाच रिअलमी U1 गोल्ड, फेरी गोल्ड स्मार्टफोनसह रियलमी बड्सचा समावेश करण्यात आलाय. विशेष म्हणजे 2,399 रुपयांची Realme बॅगपॅक(पाठीवरची बॅग) या सेलमध्ये अवघ्या एक रुपयात खरेदी करण्याची संधी आहे. ही ऑफर दरदिवशी केवळ 300 ग्राहकांसाठी असणार आहे. तसेच 499 रुपयांचा इअरबड्स 500 ग्राहकांना फ्री मिळवण्याची संधी आहे.

या सेलमध्ये रिअलमी प्रो 9,499 रुपयांत, रिअलमी प्रो2 हा स्मार्टफोन 13,990 रुपयांत आणि रिअलमी C1 7,499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हा सेल आज दुपारी 12 वाजेपासून सुरू झाला असून तो 9 जानेवारीपर्यंत चालणार आहे.

अन्य ऑफर्स –
-मोबीक्वीक मोबाइल वॉलेटमधून पेमेंट करणाऱ्या ग्राहकांसाठी 15 टक्के म्हणजेच 1500 रुपयांपर्यंत कॅशबॅक
-अॅमेझॉनवर रिअलमी यू१ खरेदी केल्यानंतर ग्राहकांना एक्सचेंज ऑफर अंतर्गत 1 हजार रुपयांची अतिरिक्त सूट
-फ्लिपकार्टवर रिअलमी 2 प्रो च्या प्री-ऑर्डर बुकिंगवर 1 हजार रुपयांची अतिरिक्त सूट

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2019 4:00 pm

Web Title: realme yo days sale discounts freebies and much more
Next Stories
1 Xiaomi Redmi 6A : कॅशबॅकसह रिलायन्स जिओ देणार १०० जीबी जास्त डेटा
2 मारुतीची नवी WagonR, या महिन्यात होणार लाँच
3 ‘क्रेटा’ला टक्कर देणार ‘निसान किक्स’, लाँच डेट झाली जाहीर
Just Now!
X