28 September 2020

News Flash

सारखे पाय दुखतात? हे करुन पाहा

कारणे समजून घ्या

प्रातिनिधिक छायाचित्र

आजच्या धावपळीच्या जीवनात पाय दुखणे अगदीच सामान्य आहे. लहान मुलांचे, युवकांचे, प्रौढांचे आणि वृद्धांनाही पायदुखी त्रास देऊ शकते.

पाय दुखण्याची कारणे –

१. लहान मुलांमध्ये कॅलशियमच्या आणि ‘ड’ जीवनसत्वाच्या अभावाने पाय दुखत असतात.

२. युवकांमध्ये आणि चाळीशीपर्यंत खूप चालल्यावर, सतत जिन्यावरून चढ उतार केल्यावर, प्रवासात किंवा अन्य कारणाने खूप वेळ उभे राहिले लागले की पायांना खूप श्रम होऊन ते दुखतात. कधी कधी पूजेला किंवा एखाद्या कार्यक्रमात खूप वेळ मांडी घालून बसायला लागले तरीही ते दुखतात.

३. पाय दुखण्याच्या गंभीर कारणांमध्ये स्पाँडिलायटिस, सायटिका असे पाठीच्या मणक्यांचे आजार, पायांच्या रक्तवाहिन्यांमधले आजार, व्हेरिकोज व्हेन्स, पायाच्या मोठ्या रक्तवाहिनीमध्ये निर्माण झालेली कोलेस्टेरॉलची गुठळी अशी काही करणे असू शकतात.

४. साठीच्या पुढे वय असलेल्या वृद्धांमध्ये विशेषतः स्त्रियांमध्ये हाडांची झीज होऊन ‘ऑस्टिओपोरोसिस’ नावाचा विकार होतो, त्यात सगळी हाडे आणि पायदेखील, खूप दुखतात.

पाय दुखणे टाळण्यासाठी –

जर एखाद्या आजाराने पाय सतत दुखत असतील, मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. पण इतर कारणांमुळे, पायदुखी होत असेल, तळपाय, नडगीचे हाड, पोटऱ्या दुखत असेल तर खालील गोष्टींवर लक्ष द्या

१. दूध प्या- दुधामध्ये कॅलशियम आणि ‘ड’ जीवनसत्व असते. लहानपणापासून जर मुले भरपूर दूध पीत असतील तर त्यांची हाडे मजबूत होतात आणि पाय दुखत नाहीत. वयाच्या पंचविशीपर्यंत दूध हा रोजच्या आहाराचा हिस्सा हवाच. पंचवीस ते पन्नास या काळात रोज कपभर दूध घ्यावे. पन्नाशीनंतर मात्र साय काढलेले दूध प्यायला हरकत नसते.

२. व्यायाम आणि खेळ- मैदानावरील खेळांनी, नियमित व्यायामाने हाडांचा कणखरपणा वाढतो. शाळा-कॉलेजच्या दिवसात रोज खेळणे शक्य असते, त्यानंतर नोकरी-धंद्यामुळे जर वेळ मिळत नसेल तर आठवड्यातून दोनदा तरी खेळावे. बॅडमिंटन, टेनिससारखे दोघा-तिघांच्या गटात खेळता येण्यासारखे खेळ यासाठी उपयुक्त ठरू शकतात. पस्तिशीनंतर मात्र प्रत्येकाने रोज किमान चालण्याचा व्यायाम करावा. योगासने, दोरीवरच्या उड्या, सूर्यनमस्कार यांचाही चांगला फायदा होतो.

३. धूम्रपान सोडा- तंबाखू, गुटखा आणि धूम्रपानामुळे पायांच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे थोडे जरी चालले तरी पाय आणि पोटऱ्या कमालीच्या दुखतात.

४. वजन कमी करा- आपले पूर्ण वजन आपल्या पायांवर पेलले जाते. त्य्तामुळे वजन वाढले की गुडघे, घोटे आणि टाचा दुखू लागतात.

५. आहार- शाकाहारामध्ये सीताफळ, दूध, दही, पनीर; तर मांसाहारात ट्युना आणि सामन मासे, मटण, अंड्यातील पिवळा बलक, कॉडलिव्हर ऑईल यातून कॅलशियम आणि ड जीवनसत्व मिळते. आपल्या आहारपद्धतीप्रमाणे यांचा भरपूर वापर करावा.

डॉ. अविनाश भोंडवे, फॅमिली फिजिशियन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2017 6:40 pm

Web Title: reasons and easy remedy for leg pain important tips for health
Next Stories
1 रोज चार कप कॉफी सेवनाने दीर्घायुष्य
2 मधुमेहींनो सणासुदीच्या काळात ‘असा’ जपा खाण्यातला गोडवा
3 ‘हे’ पदार्थ खाल्ल्याने तुम्ही दिसता वयस्कर
Just Now!
X