स्थूलपणा किंवा लठ्ठपणा वयाने मोठया माणसांप्रमाणेच लहान मुलांमध्येदेखील ही समस्या वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. शरीरात चरबीचे(फॅट) प्रमाण वाढण्यालाच लठ्ठपणा म्हणतात. बदललेली जीवनशैली, अनियमीत खाण्याच्या सवयी अशी अनेक लठ्ठपणाची कारणे आहेत. त्यातील महत्वाची  कारणे-
१. खाण्याच्या पद्धतीत आता बराच बदल झालेला दिसतो. सकस आहारापेक्षा जंक पदार्थ खाण्याकडे युवापिढीचा कर वाढलेला आहे. उदा- पिझ्झा, बर्गर इत्यादी.
२. शरीराला काम करण्यासाठीची ऊर्जा कॅलरीपासून मिळते. शरीराच्या गरजेपेक्षा जास्त कॅलरीज घेण्यात आल्यास त्या साठून राहतात व लठ्ठपणाला सुरूवात होते. बैठे काम करणाऱयांना हा त्रास होतो.  
३. अत्याधुनिक किंवा इंटरनेटच्या जालात टिकून राहण्यासाठी वाढलेला अभ्यासक्रम, कामावरचा तणाव यासर्व घटकांचा चयापचय क्रियेवर दुष्परिणाम होऊन वजन वाढण्यास सुरूवात होते.
४. औषधांचे अतिसेवन हे देखील लठ्ठपणा वाढण्याचे कारण आहे. सर्दी, खोकला, ताप अशावेळी लवकर बरे वाटावे यासाठी सर्रास स्टिरॉईडचा वापर करण्यात येतो. स्टिरॉईडच्या शरीरातील वाढत्या प्रमाणामुळे लठ्ठपणाला सुरुवात होते.

flowers, plant flowers,
निसर्गलिपी : हिरवा कोपरा
chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !