News Flash

गरजूंना रिचार्ज करा अन् मिळवा कॅशबॅक; व्होडाफोन-आयडियाची भन्नाट ऑफर

व्होडाफोन-आयडिया प्रीपेड ग्राहकांसाठी लागू- कोणासाठी तरी रिचार्ज करा व पुढील रिचार्जच्या वेळी कॅशबॅक रक्कम मिळवा 

व्होडाफोन आयडियाने सध्याच्या आव्हानात्मक काळात ग्राहकांना एकमेकाशी डिजिटल पद्धतीने संपर्कात राहता यावे, यासाठी #रिचार्जफॉरगुड हा विशेष उपक्रम आज जाहीर केला आहे. या कार्यक्रमामुळे प्रत्येक व्होडाफोन व आयडिया ग्राहकाला मित्र, कुटुंबीय किंवा ऑनलाइन रिचार्ज कसे करावे हे माहीत नसलेल्या किंवा इंटरनेट उपलब्ध नसलेल्या अन्य कोणाहीसाठी रिचार्ज करता येणार आहे. तुमच्या या मदतीची दखल घेऊन, व्होडाफोन किंवा आयडिया ग्राहकाने कोणासाठीही मायव्होडाफोन अॅप किंवा मायआयडिया अॅपद्वारे रिचार्ज केल्यास त्यावर त्यास 6% पर्यंत कॅशबॅकचे बक्षीस दिले जाणार आहे.

आणखी वाचा : दुसऱ्याचं रिजार्ज करा आणि मिळवा फायदा; Jio, Airtel ची भन्नाट ऑफर

नव्या #रिचार्जफॉरगुड कार्यक्रमाविषयी बोलताना, व्होडाफोन आयडियाचे व्यवस्थापकीय संचालक अवनीश खोसला यांनी सांगितले, “सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीचा परिणाम आमच्या असंख्य प्रीपेड ग्राहकांवर झाला असून त्यांना घराबाहेर जाणे व रिचार्ज करणे शक्य नाही आणि/किंवा डिजिटल पद्धतीने त्यांच्याकडे इंटरनेट उपलब्ध नाही. एक दूरसंचार कंपनी या नात्याने, सध्यासारख्या अनिश्चित काळातही सर्व ग्राहकांना सुरळित कनेक्टिविटी उपलब्ध करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो. सध्याच्या कठीण काळामध्ये फोन रिचार्ज करण्यामध्ये अडचणी येत असणाऱ्या सबस्क्रायबरसाठी रिचार्ज सुविधा उपलब्ध करणे, हे उद्दिष्ट ठेवून #रिचार्जफॉरगुड कार्यक्रम दाखल करत आहोत. डिजिटल सेवा वापरणाऱ्या व्होडाफोन व आयडिया प्रीपेड ग्राहकांनी #रिचार्जफॉरगुड एक किंवा अनेक करून उत्तम काम करावे.“
व्होडाफोन आयडिया

#रिचार्जफॉरगुड कसे काम करते: – प्रीपेड ग्राहकांनी माय व्होडाफोन अॅप किंवा माय आयडिया अॅप येथे लॉगिन करावे आणि अन्य कोणत्याही व्होडाफोन आयडिया प्रीपेड ग्राहकासाठी रिचार्ज करावेत्यानंतर रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना त्यांनी रिचार्ज केलेल्या  मूल्यानुसार कॅशबॅक मिळेल  कॅशबॅक कुपन ग्राहकाच्या नंतरच्या रिचार्जसाठी वापरता येऊ शकते

टीप – मायव्होडाफोन अॅप किंवा मायआयडिया अॅप याद्वारे केलेल्या रिचार्जवरच केवळ कॅशबॅक ऑफर उपलब्ध आहे

#रिचार्जफॉरगुड ऑफर 9 एप्रिल 2020 पासून व्होडाफोन ग्राहकांसाठी 10 एप्रिल 2020 पासून आयडिया ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. ही ऑफर 30 एप्रिल 2020 पर्यंत लागू आहे.

आपल्या जवळच्या व्यक्तींच्या संपर्कात राहणे गरजेचे आहे, ही ग्राहकांची गरज ओळखून व्होडाफोन आयडियाने सादर केलेल्या निरनिराळ्या उपक्रमांमध्ये या आणखी एका उपक्रमाचा समावेश झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2020 3:24 pm

Web Title: recharge for someone in need and help them stay connected through vodafone ideas rechargeforgood program nck 90
Next Stories
1 चप्पल आणि बुटांच्या माध्यमातूनही पसरतोय करोना? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात
2 शांत झोप हवीय? हे उपाय करून पाहाच
3 दुसऱ्याचं रिजार्ज करा आणि मिळवा फायदा; Jio, Airtel ची भन्नाट ऑफर
Just Now!
X